सिंधुदुर्ग today



नांदगाव येथील श्री. देव कोळंबा वार्षिक जत्रोत्सवाला भक्तांचा जनसागर लोटला 

हजारो भाविकांची दर्शनासाठी झाली गर्दी 

बाबा देवा कोळंब्या महाराजा... होय महाराजा...

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

बाबा देवा कोळंब्या महाराजा... हात भेटेचो नारळ आणि तुझ्या चाळ्याक भक्ष दिला आहे... तो पावन करून घे आणि सर्वांना सुखी ठेव रे महाराजा... होय महाराजा... अशा प्रकारे 

कोळंबा देवाला साकडे घालत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव येथे जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री देव कोळंबा वार्षिक जत्रोत्सव आज रविवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

      या जत्रोत्सवाला आज सकाळपासून मागील नवसाची फेड करण्यासाठी भाविकांची तोबा गर्दी पहायला मिळत आहे.

जत्रोत्सवासाठी मोठा सभामंडप उभारण्यात आला असून महीला व पुरुष भक्तांना दोन स्वतंत्र रांगा दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. तसेच विविध दुकाने थाटली असल्याने या जत्रोत्सवाला मोठे स्वरूप प्राप्त झाले होते. त्याच प्रमाणे विद्युत रोषणाईने नांदगाव कोळंबा परिसर उजळून निघाला आहे.

या जत्रोत्सवासाठी मटण भाकरीचा महाप्रसाद दिला जातो . एवढ्या मोठ्या प्रमाणात भाकरी लागत असल्याने जवळपास ७०० ते ८०० किलो भाकरी पिठाचे वाटप नांदगाव परिसरात करुन भाकरी भाजून दिल्या जातात. सायंकाळी पाच वाजता वर्षभरात जे मृत व्यक्ती आहेत अशांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत महाप्रसादाला सुरुवात झाली.

      जवळपास हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी झालेली होती. यामुळे येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून योग्य प्रकारे नियोजन कोळंबा उत्सव समिती नांदगाव अध्यक्ष नागेश मोरये व त्यांच्या सर्व टिम ने केले आहे.

जत्रोत्सवाला लागणारे कोंबडे बाजारात

नांदगाव येथील जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री देव कोळंबा जत्रोत्सवा खास खासियत म्हणजे या  जत्रोत्सवासाठी नवस फेड करताना कोंबडा किंवा बकरा नवस दिला जातो . यामुळे आरवते कोंबडे खरेदीसाठी आज सकाळपासून बाजारात गर्दी झालेली आहे.

मुंबई कर चाकरमानी तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल

कोळंबा वार्षिक जत्रोत्सव दरवर्षी मे महिन्यात असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा तसेच बाहेरील भाविक तसेच मुंबई कर चाकरमानी आवर्जून या जत्रोत्सवासाठी हजेरी लावतात.आताही मुंबई कर चाकरमानी तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी अगदी मुंबई गोवा महामार्ग पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

रविवारचा आठवडा बाजार झाला हाऊसफुल्ल.

नांदगावातील कोळंबा जत्रोत्सव हा दरवर्षी मे महिन्यात असतो आणि तो ही रविवारी व रविवार म्हटला की नांदगाव गावचा हाऊसफुल्ल आठवडा बाजार या बाजारात गावठी आरवते 

कोंबडे ,नारळ , अगरबत्ती तसेच इतर खरेदीसाठी झुंबड उडाली होती. यामुळे या आजच्या बाजारात लाखोंची उलाढाल झाली आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today