सिंधुदुर्ग today

 


नांदगाव येथील जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री. देव कोळंबा वार्षिक जत्रोत्सव रविवारी.

जत्रोत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात.

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या नांदगाव येथे जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री देव कोळंबा वार्षिक जत्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. रविवार दिनांक  ११ मे २०२५ रोजी कोळंबा देवाचा वार्षिक जत्रोत्सव होणार आहे.

        रविवार दिनांक ११ मे रोजी होणाऱ्या श्री देव कोळंबा वार्षिक जत्रोत्सव निमित्ताने कार्यक्रम सकाळी ८ ते ९ पूजाविधी, सकाळी ९ ते २ नवस फेड करणे , दुपारी १२ ते ४ नवीन नवस बोलणे, सायंकाळी ४ ते ८ महाप्रसाद अशा प्रकारे जत्रोत्सव असणार आहे. 

मंडप चे काम दिवस रात्र सुरू.

जत्रोत्सवाला अवघे दोन दिवस बाकी उरले असल्याने सभामंडपाचे काम जोरदार सुरू आहे. दिवस रात्र मंडप चे काम केले जात आहे. मंदिर परिसरात स्वच्छता करुन शेणाने सारवण्यात आले आहे.

जत्रोत्सवात मटण भाकरीचा प्रसाद ;भाकरी पिठाचे नियोजन.

या जत्रोत्सवाचे विशेष म्हणजे येथे येणाऱ्या भाविकांना दर्शन घेतल्यानंतर मटण व भाकरीचा प्रसाद दिला जातो. यामुळे जवळपास हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. यामुळे येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात भाकरी च्या पिठाचे नांदगाव आणि परिसरात घरोघरी वाटप केले जाते. या बाबतीत सर्व नियोजन आजच्या बैठकीत करण्यात आले आहे.

जत्रोत्सवाला लागणारे कोंबडे बाजारात 

नांदगाव येथील जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री देव कोळंबा जत्रोत्सवा खास खासियत म्हणजे या  जत्रोत्सवासाठी नवस फेड करताना कोंबडा किंवा बकरा नवस दिला जातो . यामुळे आरवते कोंबडे बुकिंग आतापासूनच सुरू झाले आहे. 

मुंबई कर चाकरमानी गावात दाखल 

कोळंबा वार्षिक जत्रोत्सव दरवर्षी मे महिन्यात असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा तसेच बाहेरील भाविक तसेच मुंबई कर चाकरमानी आवर्जून या जत्रोत्सवासाठी हजेरी लावतात.आताही मुंबई कर चाकरमानी नांदगाव परिसरात मोठ्या संख्येने दिसत आहेत. 

रविवारचा आठवडा बाजार होणार हाऊसफुल्ल.

नांदगावातील कोळंबा जत्रोत्सव हा दरवर्षी मे महिन्यात असतो आणि तो ही रविवारी व रविवार म्हटला की नांदगाव गावचा हाऊसफुल्ल आठवडा बाजार या बाजारात गावठी आरवते कोंबडे ,नारळ , अगरबत्ती तसेच इतर खरेदीसाठी झुंबड उडणार हे मात्र नक्की.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today