सिंधुदुर्ग today
ओम गणेश मित्र मंडळ नांदगाव वाशिनवाडी आयोजित श्री सत्यनारायण महापूजे निमित्त उद्या विविध कार्यक्रम.
सायं ६ वा. महिला दिंडी भजन
नांदगाव /प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील ओम गणेश मित्र मंडळ नांदगाव वाशिनवाडी आयोजित दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही उद्या मंगळवार दिनांक १३ मे २०२५ रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.
यानिमित्ताने कार्यक्रम सकाळी ९.३० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. आरती व तिर्थ प्रसाद , दुपारी १ ते ३ महाप्रसाद , दुपारी ३ ते ५ महिलांसाठी हळदीकुंकू, समारंभ, ४ ते ५ स्थानिक भजन, सायंकाळी ६ ते ८ श्री रवळनाथ प्रासादिक महिला दिंडी भजन मंडळ पडवे यांचे दिंडी भजन होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा