सिंधुदुर्ग today
वरेरी राणे वाडी येथे महोत्सव निमित्त एकपात्री अभिनय, नृत्य व संगीत चक्री भजन स्पर्धा
देवगड प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील वरेरी येथील राणेवाडी विकास मंडळ, मुंबई/ग्रामस्थ ,वरेरी श्री सत्यनारायण महापूजे निमित्त दिनांक ९ व १० मे २०२५ असे दोन दिवस राणे वाडी महोत्सव आयोजित करून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा,खुली एकेरी नृत्य स्पर्धा तालुकास्तरीय संगीत चक्री भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
राणेवाडी विकास मंडळ मुंबई/ग्रामस्थ,वरेरी (या.देवगड) यांच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक ९ मे २०२५ रोजी जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा यामधील प्रथम क्रमांक विजेत्यास रोख रक्कम ३३३३ व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक २२२२ व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक ११११ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.तर जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धा दोन गटात घेण्यात येईल.यामध्ये १२ वर्षांखालील व १२ वर्षाच्या वरील असे दोन गट असतील.यामधील विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ३३३३,२२२२,११११ प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल.तर शनिवार दिनांक १० मे रोजी तालुकास्तरीय संगीत चक्री भजन स्पर्धा होणार आहे.तरी इच्छूक स्पर्धक व भजन मंडळांनी अधिक माहिती नियम अटी जाणून घेण्यासाठी सुहास राणे ८४६८८९३६९६, प्रदिप राणे ९००४८१४२२२ यांच्याशी संपर्क साधवा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा