सिंधुदुर्ग today



नांदगाव तिठा ब्रिज खाली झालेल्या भिषण अपघातातील सेवानिवृत्त कंट्रोलर ऊमर  नावलेकर यांचे निधन 

दोन महिन्यांपूर्वी झाला होता अपघात.

कणकवली | प्रतिनिधी 

 कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा ओव्हर ब्रिज खाली ९ मार्च रोजी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास ट्रक व दुचाकी या दोन वाहनांमध्ये झालेल्या भिषण अपघातातील गंभीर जखमी झालेल्या सेवानिवृत्त कंट्रोलर ऊमर नावलेकर यांचे काल सायंकाळी उशिरा निधन झाले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. दोन महिन्यांपूर्वी नांदगाव तिठा ब्रिज खाली अपघात झाला होता. या अपघातात दुचाकीस्वार उमर इमाम नावलेकर यांचा एक पाय जाग्यावरच पूर्णत: तुटला होता . गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत त्यांना तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन अधिक उपचारासाठी बांबूळी येथे हलविण्यात आले होते. दोन महिन्यांपासून बांबुळी येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोल्हापूर येथे अधिक उपचारासाठी दाखल करावयाचे असल्याने कालच त्यांचा डिस्चार्ज मागून घरी नांदगाव येथे आणले होते. मात्र घरी आणल्यानंतर त्यांचे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. एस टी महामंडळात त्यांनी वाहक म्हणून नोकरी बजावताना तळेरे बस स्थानक येथे काही वर्ष कंट्रोलर म्हणून काम पाहिले होते. नांदगाव महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती चे अध्यक्ष पद ही त्यांनी भुषविले होते. आता विद्यमान तंटामुक्त समिती अध्यक्ष इमाम ऊर्फ राजा नावलेकर यांचे ते वडील होत.

    त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,४ विवाहित मुली ,जावई नातवंडे, असा मोठा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today