सिंधुदुर्ग today
आगामी तीन महिन्याचे धान्य 30 जूनपर्यंत उचल करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी,(ऋषिकेश मोरजकर):
अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार आगामी पावसाळा, पूर परिस्थिती इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता लाभार्थ्यांनी वेळेत अन्नधान्याचे वितरण करण्यासाठी माहे जून, जुलै व ऑगस्ट 2025 चे अन्नधान्याची आगाऊ उचल व वाटप करण्याचे केंद्र व राज्य शासनाचे निर्देश आहेत. तरी पात्र अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थ्यांनी तीन महिन्यांचे धान्य दि. 30 जून 2025 पर्यंत संबंधित रास्त भाव धान्य दुकानदारांकडून उचल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले आहे.
धान्याची आगाऊ उचल करताना लाभार्थ्यांनी ईपॉस मशीन वर तीन वेळा अंगठा (Thumb) लावून माहे जून, जुलै व ऑगस्ट महिन्यांचे धान्य मिळाल्याची खात्री करावी. लाभार्थ्यांनी लवकरात लवकर धान्य उचल करुन शासनाच्या धोरणात्मक घेतलेल्या निर्णयाची अंमलबलावणी कामात सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा