पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
देवगड तालुक्यातील वानिवडे गावातील उ.बा.ठा चे ग्रामपंचायत सदस्य व असंख्य ग्रामस्थांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश आमदार नितेश राणे यांच्या वानिवडे गावातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश कणकवली प्रतिनिधी  देवगड तालुक्यातील वानिवडे मधील उबाठाचे कार्यकर्ते रमेश श्रीधर प्रभू ग्राम.प.सदस्य,चेतना महादेव बामणे ग्राम.प.सदस्य, चंद्रकांत बामणे, दत्ताराम कोतेकर,गणपत प्रभु, सुहास प्रभु, संतोष घाडी, सुनिल मुळीक, भालचंद्र बामणे, रविंद्र बामणे, रामदास मासये, प्रदिप घाडी,यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे वानिवडे गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे. यावेळी आमदार नितेश राणे,अमोल तेली,बाळा खडपे, बापू घाडी, सरपंच सुयोगी घाडी, आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तात्कालीन ग्रामविकास अधिकारी मंगेश राणे यांचा सत्कार  नांदगाव प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत चे तात्कालीन ग्राम विकास अधिकारी श्री मंगेश राणे यांनी नांदगाव ग्रामपंचायत येथे गेले दोन वर्ष प्रभारी म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता आता नव्याने कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी म्हणून आर.डी.सावंत यांची नियुक्ती झाल्याने तात्कालीन ग्रामविकास अधिकारी मंगेश राणे यांचा निरोप समारंभ नांदगाव ग्रामपंचायत तर्फे आयोजित करून विशेष सत्कार करण्यात आला आहे .       यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर,उपसरपंच इरफान साटविलकर,ग्रामविकास अधिकारी आर.डी.सावंत, ओटव माजी सरपंच हेमंत परुळेकर, नांदगाव ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका,आशा सेविका, कृषी अधिकारी, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू तांबे, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.        यावेळी उपस्थित सरपंच, सदस्य, यांनी मंगेश राणे यांनी केलेल्या कामाचा आढावा घेऊन आभार मानले आहे.        मंगेश राणे यांनी ही आपल्या मनोगतात गावाच्या विकासासाठी शुभेच...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव महावितरण कार्यालय येथे विज ग्राहक यांचा घेराव सुरू  विज ग्राहक विविध समस्यांबाबत आक्रमक. काही प्रमाणात बाचाबाची  कार्यालय ठिकाणी पोलीस चोख बंदोबस्त; पोलीस निरीक्षक जगताप उपस्थित. नांदगाव ( ऋषिकेश मोरजकर)  नांदगाव महावितरण कार्यालय येथे नांदगाव दशक्रोशीतील विज ग्राहकांचा घेराव सुरू झाला आहे. विज ग्राहक विविध समस्यांबाबत आक्रमक पवित्रा घेतला जात असून कार्यालय ठिकाणी पोलीस चोख बंदोबस्त ठेवला आहे स्वतः पोलीस निरीक्षक श्री जगताप ही उपस्थित आहेत.      आंदोलन मध्ये नांदगाव सरपंच भाई मोजकर , उपसरपंच इरफान साटविलकर,माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर,ओटव  सरपंच रुहीता तांबे, बेळणे सरपंच अविनाश गिरकर ,तोंडवली बावशी ग्रुप ग्रामपंचायत माजी उपसरपंच अशोक बोभाटे, नांदगाव माजी सरपंच पंढरीनाथ पारकर ओटव  माझ्या सरपंच हेमंत परुळेकर , व्यापारी संघटना अध्यक्ष पप्पी सापळे, असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके, प्रदीप हरमळकर,नांदगाव बावशी पोलीस पाटील समिर मयेकर , तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजू तांबे, अनिकेत तर्फे,इक्बाल बटवाले, कोळो...

सिंधुदुर्ग today

इमेज
  समाज साहित्य प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यवाहपदी सुरेश बिले डॉ.योगिता राजकर, मनीषा शिरटावले यांचीही कार्यकारणीवर निवड संस्था अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांची माहिती कणकवली/प्रतिनिधी         महाराष्ट्राच्या साहित्य सांस्कृतिक चळवळीत लक्ष वेधून घेणाऱ्या समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या मुख्य कार्यवाहपदी कणकवली येथील ज्येष्ठ सांस्कृतिक कार्यकर्ते आणि कवी सुरेश बिले यांची निवड करण्यात आली आहे. तर समाज साहित्य प्रतिष्ठानच्या कार्यकारणी सदस्यपदी कवयित्री डॉ.योगिता राजकर, मनीषा शिरटावले यांची निवड करण्यात आली. कणकवली येथे झालेल्या संस्थेच्या वार्षिक सभेमध्ये सदर नवीन पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांनी दिली.        कणकवली येथील अभंग निवास अक्षय सभागृह येथे झालेल्या संस्थेच्या वार्षिक सभेमध्ये नवीन पदाधिकारी निवडण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेला संस्था अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांच्यासह संस्थेच्या उपाध्यक्ष मनीषा पाटील, कोषाध्यक्ष प्रमिता तांबे, सहकार्यवाह प्रियदर्शनी पारकर, इतर पदाधिकारी ॲड....

सिंधुदुर्ग today

इमेज
  साळीस्ते शाळेत शिवविचार मोहीम मावळे आम्ही स्वराज्याचे यांचा सामाजिक उपक्रम कणकवली /प्रतिनिधी  मावळे आम्ही स्वराज्याचे,महाराष्ट्र राज्य..{ रजि } सिंधुदुर्ग जिल्हा मार्फत  गेले दोन वर्ष राबविण्यात येणारा सामाजिक उपक्रम म्हणजे शाळा तिथे शिवविचार  दि. 27/07/2024 जि.प.शाळा 01 साळीस्ते ता - कणकवली येथे पार पडला. या कार्यक्रमाला शाळेतील विध्यार्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला, कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल माहिती सांगून कार्यक्रमाची  सुरवात झाली.. मुलांना माहित नसलेला इतिहास ऐकून त्याचा मनात महाराजांविषयी  आणि इतिहासा विषयी प्रेरणा निर्माण झाली, *महाराजांचा पराक्रम, अपरिचित गडकिल्ले, महाराजचं नियोजन, युद्ध कला, गडसंवर्धन* अशा विषयांवर मुलांना मार्गदर्शन करण्यात आले.याच विषयांच्या  आधारावर मुलांसोबत प्रश्नमंजुषा  कार्यक्रम घेऊन त्यामधून अचूक उत्तर देण्याऱ्या प्रत्त्येक विद्यार्थ्याला  पेन वाटप करण्यात आले, त्यामधून  दोन क्रमांक निवडले ते पुढीलप्रमाणे:-  *प्रथम .स्वरा रवींद्र चिके {इ. 6 वी } द्वितीय.समर्थ गोविंद सुतार {इ. 6वी }* ...

सिंधुदुर्ग today

इमेज
तोंडवली बोभाटे वाडी येथील त्या घटनेतील व्यक्ती सापडली  मानसिक स्थिती योग्य नसल्याचे निष्पन्न ; परिसरातील नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास  स्थानिक ग्रामस्थ व पोलीस पाटील यांनी दिले पोलीसांच्या ताब्यात  नातेवाईकांशी झाला संपर्क.   कणकवली ऋषिकेश मोरजकर  कणकवली तालुक्यातील तोंडवली बोभाटे वाडी येथील त्या घटनेतील व्यक्ती सापडली असून मानसिक स्थिती योग्य नसल्याचे निष्पन्न झाले आहे.स्थानिक ग्रामस्थ व पोलीस पाटील यांनी सदर व्यक्तीला  पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान त्याच्या छत्तीसगड मधील  नातेवाईकांशी झाला संपर्क झाला असून नातेवाईक नागपूर पर्यंत आले असल्याचे समजले आहे.      या प्रकारामुळे तोंडवली व नांदगाव परिसर नव्हे तर तालुक्यात खळबळ उडाली होती मात्र आता नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.            काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास विनोद बोभाटे यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस एक व्यक्ती घरामध्ये प्रवेश करत हल्ला करायला सुरुवात केली. या झटापटीत सदर व्यक्तीचे आधार कार्ड घरातच पडले होते . त्यानंतर त्यान...

सिंधुदुर्ग today

इमेज
असलदे गावातील वीज समस्या न सोडवल्यास नांदगाव कार्यालयाला टाळे ठोकणार वीज वितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता विलास बगडे यांना असलदे ग्रामस्थांचा इशारा  कणकवली दि. २७ जुलै ( प्रतिनिधी ) असलदे ‌गावात अतिवृष्टीत २५ ते ३० ग्राहकांचा मीटर जळून खाक झाले आहेत. ते वीज मीटर विनाशुल्क ग्राहकांना बदलून मिळावेत. वीज लाईनवर आलेली झाडी कटींग करण्यात यावी. अधिकारी व कर्मचारी वीज ग्राहकांचे फोन उचलत नाहीत . तसेच ग्राहकांशी उद्धट बोलतात, त्यांना समज देण्यात यावी.  वीजेचा लपंडाव गावात सुरु आहे, गेले दोन दिवस अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा गावातील खंडीत झाला आहे. गावातील अनेक पोल जीर्ण झालेले असून धोकादायक बनलेले आहेत.  असलदे गावातील वीज समस्या न सोडवल्यास नांदगाव कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा  वीज वितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता विलास बगडे यांना ग्रामस्थांनी दिला आहे.त्यावर कार्यकारी अभियंत्यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. कणकवली येथील वीज वितरणाच्या उपविभागीय कार्यालयात असलदे ग्रामस्थांनी धडक दिली.यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी चेअरमन भगवान लोके , व्हाईस चेअरमन दया...