पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
कवी अजय कांडर यांचा युगानुयुग तूच काव्यसंग्रह आता हिंदी मध्ये प्रसिद्ध अनुवादक सुधाकर शेंडगे यांच्याकडून हिंदीत भाषांतर दिल्लीच्या वाणी प्रकाशनतर्फे 'युग युग से तू ही' शीर्षकाने प्रसिद्ध कणकवली/ऋषिकेश मोरजकर         एका वर्षात तीन आवृत्या प्रसिद्ध होऊन सर्वाधिक बहुचर्चित ठरलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील कवी अजय कांडर लिखित 'युगानुयुगे तूच ' हा दीर्घ काव्यसंग्रह  आता हिंदीमध्ये अनुवादित झाला आहे. प्रसिद्ध अनुवादक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ. सुधाकर शेंडगे यांनी या संग्रहाचे हिंदी भाषांतर केले असून दिल्ली येथील विख्यात वाणी प्रकाशनातर्फे 'युग युग से तू ही ' या शीर्षकांतर्गत आता हा अनुवाद प्रसिद्ध होत आहे.90 नंतरच्या पिढीत कोकणात राहून लिहिणाऱ्या कवींपैकी कवी अजय कांडर यांचा हा एकमेव संग्रह अन्य भाषेत भाषांतरित झाला आहे.       लोकवाड:मय गृह प्रकाशित युगानुयुगे तूच हा दीर्घ कवितासंग्रह 2019 मध्ये प्रसिद्ध झाला. प्रकाशन पूर्व पहिली आवृत्ती बुक झालेला हा मराठीतील पहिलाच काव्यसंग्रह. त्यामुळे एका...

सिंधुदुर्ग today

इमेज
बिअर टिन मध्ये अडकला  बिवड जातीचा साप... फोंडाघाट मधील घटना  कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  थंडगार बिअरचा मोह भल्या भल्यांना सोडवत नाही अस म्हणतात.माणूस ते माणूस पण मुक्या जनावरांना ही आकर्षक असणाऱ्या या बिअरच्या टिनचा मोह आवरत नाही.आणि मोह हा नेहमीच अडचणीचा ठरत असतो याचा अनोखा प्रत्यय देणारी ही घटना.आकर्षक दिसणा-या रिकाम्या टिन मध्ये तोंड घालून अंदाज घ्यायचा प्रयत्न करणाऱ्या सापाची चांगलीच फजीती झाली.तोंडावर अडकलेला टिन अशा अवस्थेत काही तास वावरणाऱ्या या सापाची स्थानिक युवकांनी धाडस करत मोठ्या मुश्किलीने सोडवणूक केली.प्राथमिक उपचार करून या युवकांनी त्या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडले. फोंडाघाट येथील आजूबाजूला जंगलमय भाग असलेल्या एका घराच्या कुंपणात कुत्रे जास्त भुंकू लागल्याने घर मालकाने कानोसा घेतला.कानोसा घेताना समोरचे चित्र पाहून त्या घर मालकाची बोबडीच वळली.एक साप बिअरच्या टिन मध्ये तोंड अडकलेल्या अवस्थेत अंदाजाने चक्क फिरताना दिसला.बराचा वेळ तो साप त्या अवघडलेल्या अवस्थेत दिसल्या नंतर त्या घर मालकाने हेल्प अकॅडमी फोंडाघाट या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला कळवल.या संस्थेच्य...

सिंधुदुर्ग today

इमेज
  जयंत पवार कथा पुरस्कार ऐश्वर्या रेवडकर, जयदीप विघ्ने यांना जाहीर समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे कथा स्पर्धेचे आयोजन प्रतिष्ठान अध्यक्ष मधुकर मातोंडकर, कार्यवाह वैभव साटम यांची माहिती कणकवली/ऋषिकेश मोरजकर      सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग सुपुत्र साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ कथाकार जयंत पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या कथा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. बार्शी येथील ऐश्वर्या रेवडकर यांच्या 'एका आत्महत्येची तयारी' व बुलढाणा येथील जयदीप विघ्ने यांच्या 'सटवा' या कथांना जयंत पवार कथा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुरस्काराचे वितरण डिसेंबरमध्ये मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या समाज साहित्य विचार संमेलनात करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि प्रमुख कार्यवाह वैभव साटम यांनी दिली!     पाच हजार रुपये, स्मृती चिन्ह, ग्रंथ असे स्वरूप असलेल्या या स्पर्धेतील  प्राथमिक कथा निवड परीक्षक म्हणून समीक्षक डॉ. गोमटेश्वर पाटील- कोल्हापूर, कथाकार प्रा. विवेक कुडू - पालघर आणि कादंबरीका...

सिंधुदुर्ग today

इमेज
ओटव नवनिर्वाचित सरपंच रुहिता तांबे यांनी  स्वीकारला पदभार उपसरपंच पदी दुर्गेश रामचंद्र ओटवकर यांची बिनविरोध निवड   नांदगाव प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत ओटव ग्रामपंचायत सरपंच म्हणून रुहिता राजेश तांबे  विजयी ठरल्या होत्या. त्यांनी आज सरपंच पदाचा पदभार स्वीकारला आहे. तर उपसरपंच पदी दुर्गेश रामचंद्र ओटवकर यांची बिनविरोध निवड  झाली आहे.       ओटव चे माजी सरपंच हेमंत परुळेकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
बेळणे खुर्द नवनिर्वाचित सरपंच अविनाश गिरकर यांनी  स्वीकारला पदभार उपसरपंच पदी पंढरीनाथ चाळके यांची बिनविरोध निवड  नांदगाव प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत बेळणे ग्रामपंचायत सरपंच म्हणून अविनाश राजाराम गिरकर विजयी ठरले होते . त्यांनी आज सरपंच पदाचा पदभार स्वीकारला आहे. तर उपसरपंच पदी पंढरीनाथ चाळके यांची बिनविरोध निवड झाली आहे.      यावेळी नवनिर्वाचित सदस्य अंकिता भरत चाळके, राजेंद्र वसंत चाळके,वनिता महादेव मोरजकर,शर्मिला राजेंद्र तांबे,संघवी सुनील तांबे,सिद्धार्थ गंगाराम तांबे,ग्रामसेवक - वैभव ठाकूर तलाठी (निवडणूक अधिकारी)- सापळे मॅडम आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव अपघात प्रकरणी आक्रमक ग्रामस्थांच्या पवित्र्यानंतर हायवे प्राधिकरण दाखल होत बस स्टॉप मागे घेण्याचे दिले आश्वासन नांदगाव ऋषिकेश मोरजकर मुंबई गोवा महामार्गावर क्र. 66 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव पाटीलवाडी येथे भरधाव कार चालकाचा कार वरील नियंत्रण सुटल्याने थेट येथील दत्तमंदिर बस स्टॉपला धडक देत कार महामार्गावर विरूद्ध दिशेने पटली झाली तर बसस्टॉप जमिनदोस्त होत नुकसान झाले.या अपघातात बसस्टॉप मधील प्रेरणा राजेंद्र तांबे  काॅलेज युवतीच्या पायाला गंभीर इजा झाली असून इतरांनी प्रसंगावधान बाळगून बाहेर आल्याने मोठा अघात टळला.सदरचा अपघात सकाळी ८:३० च्या सुमारास घडला. जखमी वर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.       दरम्यान अपघात स्थळी आक्रमक भूमिका नांदगाव ग्रामस्थांनी घेतली होती  की , हायवे प्राधिकरण चे अधिकारी जोपर्यंत अपघात स्थळी येत नाही तोपर्यंत वाहन हलविणार नसल्याचा पवित्रा घेतला असल्याने अखेर  हायवे प्राधिकरणचे अभियंता शिवनिवार व केसीसी कंपनी चे पांडे दाखल होताच उपस्थित ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार सुरु केला बस स्टॉप पूर्वीपासूनच मागे घेण...

सिंधुदुर्ग today

इमेज
पत्रकाराला धमकी दिल्यापरकरणी कणकवलीतील डॉक्टरवर गुन्हा दाखल पत्रकार संरक्षण कायद्यानुसार जिल्ह्यातील पहिला गुन्हा  बातमी लिहिली म्हणून डॉक्टरची पत्रकार भगवान लोके यांना धमकी. कणकवली / प्रतिनिधी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांना प्रसुतीसाठी करावी लागते वणवण . अशा स्वरुपाची बातमी सिंधुदुर्ग 24 तास या डिजिटल माध्यमात देण्यात आली होती. या डिजिटल माध्यमाचे प्रतिनिधी भगवान लोके यांना फोन करून अपमानास्पद बोलत मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. अर्पिता महेंद्र आचरेकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम 2017 चे कलम 4 तसेच भादवी कलम 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पत्रकार संरक्षण कायद्यानुसार जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग 24 तास या डिजिटल माध्यमात कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांना प्रसूतीसाठी वणवण करावी लागते अशा मथळ्याखाली भगवा...