पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
निती आयोगाच्या शिष्टमंडळाची पोलिस अधीक्षक कार्यालयाला भेट 'सिंधुप्रहरी' कार्यप्रणालीची जाणून घेतली माहिती. परिवहन विभागानेही केले सादरीकरण. सिंधुदुर्गनगरी दि 31 (जिमाका) : सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा प्रभावी वापर सुरू केला असून, या मॉडेलचा सखोल अभ्यास करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी निगडित नीती आयोगाची विशेष टीम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. याच अनुषंगाने निती आयोगाच्या पथकातील डॉ. देवव्रत त्यागी आणि श्रीमती विदीशा दास यांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली. या भेटी दरम्यान पोलिस विभाग आणि रस्ते परिवहन विभाग कशा प्रकारे AI प्रणालीचा उपयोग करत आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ श्रीपाद पाटील, तहसिलदार दिक्षांत देशपांडे आदी उपस्थित होते.  बैठकीच्या सुरूवातीला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी सादरीकरणाव्दारे संपूर्ण माहिती दिली. सागरी सुरक्षेस...

सिंधुदुर्ग today

इमेज
  कणकवली पोलीस स्टेशन च्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पोलीस व नागरिकांची दौड. पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या सहीत सर्व पोलीस, पोलीस पाटील, होमगार्ड, विद्यार्थी, नागरिकांनी घेतला सहभाग   कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  आज दिनांक 31 ऑक्टोबर ला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त (एकता दिन) सकाळी 07.30 ते 08.15  वा. चे मुदतीत कणकवली पटवर्धन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी दौड घेण्यात आली. सदर दौडमध्ये कणकवली पोलीस निरीक्षक श्री. तेजस नलवडे, सर्व पोलीस स्टेशन चे अधिकारी अंमलदार, विद्यामंदिर हायस्कूल कणकवली चे विद्यार्थी शिक्षक, तालुक्यातील पोलीस पाटील, होमगार्ड  तसेच कणकवली शहरातील नागरिक असे एकूण सुमारे 100-150 च्या उपस्थितीत दौड घेण्यात आली.     या दौड वेळी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथील वैद्यकीय पथक व ॲम्बुलन्स दौड सोबत उपस्थित ठेवण्यात आलेली होती.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव माजी उपसरपंच निरज मोरये यांचा भाजपला सोडचिठ्ठी. मंत्री उदय सामंत आणि आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत  शिवसेनेत प्रवेश. कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव माजी उपसरपंच व भाजपाचे कार्यकर्ते निरज मोरये यांचा आज मंत्री उदय सामंत तसेच आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे शिवसेनेत प्रवेश झाला आहे त्यांच्यासोबत आज नांदगाव ग्रामपंचायत सदस्य विनोद मोरये तसेच इतर कार्यकर्त्यांनीही शिवसेनाचा धनुष्य हाती घेतला आहे.       या प्रवेशामध्ये नीरज मोरये यांच्या सहित ग्रामपंचायत सदस्य विनोद मोरये , सिद्धेश मोरये, रामचंद्र मोरये ,निलेश मोरये काही कार्यकर्ते आदींनी प्रवेश केला आहे.       कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघात ओबीसी आरक्षण पडल्याने निरज मोरये इच्छुक होते. आता त्यांना या मतदारसंघात जिल्हा परिषद ची उमेदवारी मिळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या मतदार संघात भाजपा विरुद्ध शिवसेना अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुदुर्गचा अभिमान! निती आयोगाकडून जिल्ह्यातील AI मॉडेलचा सखोल अभ्यास सुरू. निती आयोगाचे शिष्टमंडळ जिल्हा दौऱ्यावर.  पंतप्रधान कार्यालयास करणार अहवाल. सिंधुदुर्गनगरी (ऋषिकेश मोरजकर) :  देशात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली प्रभावीपणे राबविणारा पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गने ऐतिहासिक मान पटकावला आहे. या उपक्रमाची दखल देशाच्या नीती आयोगाने घेतली असून, आयोगाचे शिष्टमंडळ दोन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहे. या शिष्टमंडळामध्ये डॉ. देवव्रत त्यागी आणि श्रीमती विदीशा दास यांचा समावेश आहे. विविध विभागांनी आपल्या कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) कसा प्रभावी वापर केला आहे, याची पाहणी आयोगाकडून करण्यात येत आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नीती आयोगाच्या डॉ देवव्रत त्यागी, श्रीमती विदिशा दास या सदस्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उप वनसंरक्षक मिलिश शर्मा, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित‍ होत...

सिंधुदुर्ग today

इमेज
उंबर्डेतील तरुणीच्या मृत्यू प्रकरणी निष्काळजी डॉक्टरांवर कारवाई;  अधीक्षकांची उचलबांगडी, वैद्यकीय अधिकाऱ्याची सेवा समाप्त. वैभववाडी : प्रतिनिधी उंबर्डे (ता. वैभववाडी) येथील कु. सुंदरा प्रकाश शिवगण (वय २५) या तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील गंभीर निष्काळजीपणावर अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्जुन नरोटे यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली असून, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल माकोडे यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. घटनेनुसार, बुधवारी संध्याकाळी कु. सुंदरा शिवगण हिला प्रकृती अस्वस्थ झाल्याने नातेवाईकांनी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना डॉ. माकोडे यांनी तिला सलाईन लावले आणि रुग्णालय सोडून निघून गेले. त्याच वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरोटे हे घरी विश्रांती घेत होते, तर रुग्णालयात केवळ आरोग्यसेविका उपस्थित होती. रुग्णाची प्रकृती अचानक खालावल्याने तिला ओरोस येथे हलविण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला कॉल करण्यात आला, मात्र ती वेळेत आली नाही. १०२ रुग्णवाहिकेच्या चालकाला संपर्क साधण्याचाही निष्फळ प्रयत्न झाला. अ...

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नाम. नितेश राणे ३० ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर कणकवली : (ऋषिकेश मोरजकर) मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी ३० ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे -  गुरुवारी सकाळी ०७.०० वा. मोटारीने विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ०७.३० वा. जनरल एव्हीएशन विमानतळ येथे आगमन व विमानाने गोव्याकडे प्रयाण, सकाळी ०८.३० वा. मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, सकाळी ०९.०० वा. श्री. मंदार कल्याणकर यांच्या निवासस्थानी भेट ( स्थळ : बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग ), सकाळी ०९.१० वा. मोटारीने ओरोस, सिंधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी १२.०० वा. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनामध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता (A.I.) च्या वापराबाबत निती आयोगाच्या शिष्टमंडळाच्या आढावा बैठकीस उपस्थिती (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग, ओरोस ), दुपारी ०२.०० वा. मोटारीने मोपा, गोव्याकडे प्रयाण, दुपारी ०३.०० वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रय...

सिंधुदुर्ग today

इमेज
अबू धाबी पोर्ट्ससोबत ऐतिहासिक करार; समुद्री विकासासाठी तब्बल ₹16,500 कोटींची गुंतवणूक मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सागरी विकासाला मोठी चालना एक लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होणार; सागरी व्यापार आणि रोजगार निर्मितीचा उद्देश  मुंबई : महाराष्ट्राने समुद्री क्षेत्रात मोठी झेप घेत ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्ट्स ग्रुप सोबत महाराष्ट्र सरकारचा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) झाला आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा करार एखाद्या राज्यासोबत.आणि तेही मत्स्य व बंदरे विकास खात्यामध्ये होत असल्याने हा करार विशेष ठरला आहे.    या करारामुळे महाराष्ट्रात समुद्री क्षेत्रात आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचे दरवाजे उघडणार आहेत. तब्बल 2 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ₹16,500 कोटींची गुंतवणूक विविध क्षेत्रात होणार आहे. जहाजबांधणी, शिप-ब्रेकिंग, वॉटर ट्रान्सपोर्ट, पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर विकास, स्पोर्ट्स मॅनेजमेंट इत्यादी क्षेत्रांचा यात समावेश आहे. मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्य...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव ची सुकन्या सेरेना म्हसकर हिने कबड्डी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला मिळवून दिले सुवर्णपदक. विमानतळावर झालं जंगी स्वागत.  सिंधुदुर्ग (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग जिल्हा कणकवली तालुक्यातील नांदगाव मधली वाडी येथील सुकन्या कुमारी सेरेना सचिन म्हसकर हिने नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या एशियन युथ गेम्स कबड्डी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तिचे विमानतळावर आगमन होताच भारतामध्ये जंगी स्वागत करण्यात आले भारत माता की जय ... वंदे मातरम् अशा घोषणाही देण्यात आल्या.         याबाबत सविस्तर वृत्त असे की कणकवली तालुक्यातील नांदगाव मधली वाडी येथील सुकन्या कुमारी सेरेना सचिन मेघाली म्हसकर सध्या भांडुप मुंबई येथे वडिलांच्या नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे . सध्या दहावी इयत्तेमध्ये शिकत असतानाच वडील सचिन म्हसकर स्वतः कबड्डीपटू तसेच आई मेघाली ही सुद्धा कबड्डीपटू या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगी कुमारी सेरेना ही पण लहानपणापासूनच कबड्डीचे धडे गिरवायला लागले. सेरेनाची आई शिवछत्रपती पुरस्कार विजेती ठरली आहे. फर्स्ट एशियन गोल्ड मेडलिस्ट क...

सिंधुदुर्ग today

इमेज
बचत गटाच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणार -  पालकमंत्री नितेश राणे महिला सक्षमीकरणासाठी शासनाचे अनेक धाडसी निर्णय सर्व योजना महिलांना आत्मनिर्भर्तेकडे घेऊन जाणाऱ्या प्रत्येकाच्या घरात आर्थिक समृद्धी असंख्य योजनामुळे वैभववाडी येथे महिला मेळावा संपन्न : मोठ्या संख्येने महीलांची उपस्थीती  वैभववाडी (ऋषिकेश मोरजकर )       महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी केंद्र शासनाने धाडसी निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्व योजना महिलांना आत्मनिर्भर्तेकडे घेऊन जाणा-या  आहेत. शासनाच्या असंख्य योजनांमुळे प्रत्येकाच्या घरात आर्थिक समृद्धी आली आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न गतीने वाढविण्यासाठी महिला सक्षम बनली पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.         वैभववाडी येथे आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानांतर्गत मातृशक्ती महिला मेळावा पार पडला. या मेळाव्याला मोठ्या संख्...

सिंधुदुर्ग today

इमेज
कोळपे जि.प.मतदार संघातील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांचा मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड. कणकवली प्रतिनिधी  कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील हेत गावातील उबाठा गटाचे शेकडो कार्यकर्ते मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सामील झाले. या कार्यकर्त्यांनी आज कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तसेच पालकमंत्री ना. नितेश राणे यांची  भेट देऊन त्यांच्या कार्य शैलीवर समाधान व्यक्त करत पक्ष प्रवेश केला. या कार्यकर्त्यांमध्ये उबाठा सेनेचे भुईबावडा पंचायत समिती मतदार संघाचे निरीक्षक श्रीधर फोंडके, शाखा प्रमुख प्रभाकर राठोड  आणि हेत ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश फोंडके यांचा यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. तसेच गणेश फोंडके,राजेश फोंडके,शिवाजी डांगे, रविंद्रनाथ फोंडके,यशवंत फोंडके, नाना फोंडके, मारुती गुरव, सचिन गुरव, यश गुरव, सौरभ फोंडके, चंद्रकांत फोंडके, गावच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्य प्रतीक्षा फोंडके, सत्यवान फोंडके, प्रमिला...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव आँनलाईन रांगोळी स्पर्धेत वर्षा बापर्डेकर हिने पटकाविला प्रथम क्रमांक.  अपर्णा तेली व्दितीय तर ईशा बिडये तृतीय.  कणकवली प्रतिनिधी  सिंधुदुर्ग टुडे डिजिटल न्यूज चॅनल यांच्या वतीने तसेच नांदगाव माजी उप सरपंच निरज मोरये व सौ. प्राची निरज मोरये पुरस्कृत नांदगाव गाव मर्यादित दीपावली निमित्त अंगण रांगोळी स्पर्धेत नांदगाव वाघाची वाडी येथील कु. वर्षा दिलिप बापर्डेकर हिने १३६० लाईक मिळवित प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सौ.अपर्णा अमोल तेली यांनी १००१ लाईक मिळवित व्दितीय क्रमांक तर सौ. ईशा हरिश्चंद्र बिडये यांनी ७१७ लाईक मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. दिपावली निमित्त नांदगाव येथे अंगण रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर रांगोळी स्पर्धेत एकूण 27 स्पर्धकांनी व्हिडिओ पाठवले होते. आता लाईक शेअर करण्यासाठी अगदी आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत चुरस निर्माण झाली होती. सुयश संपादन केलेल्या अनुक्रमे तीन विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. लवकरच पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित आयोजित करण्यात येणार आहे. ...

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुदुर्ग चे  एआय मॉडेल राष्ट्रीय पातळीवर; नीती आयोग दोन दिवस करणार अभ्यास  अभ्यासासाठी नीती आयोगाचे शिष्टमंडळ ३० व ३१ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती एआयच्या नव्या पर्वात सिंधुदुर्ग जिल्हा  ठरला देशातील पहिला ए.आय. प्रणाली स्वीकारणारा जिल्हा   एआय च्या माध्यमातून झालेल्या बदलांची आणि सुधारणांची माहिती आयोगासमोर सादर करणार सिंधुदुर्ग : (ऋषिकेश मोरजकर)  देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली स्वीकारणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जात आहे. या अद्वितीय मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाने पुढाकार घेतला असून, आयोगाचे शिष्टमंडळ येत्या 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी दोन दिवसांच्या दौऱ्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमीसे, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आदी उपस्थित होते.   मंत्री नितेश राणे म्हणाले,नीती आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात आलेल्...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथील दीपावली निमित्त आँनलाईन रांगोळी स्पर्धेत पहायला मिळत आहे चुरस. कणकवली प्रतिनिधी  सिंधुदुर्ग टुडे डिजिटल न्यूज चॅनल यांच्या वतीने तसेच नांदगाव माजी उप सरपंच निरज मोरये सौ. प्राची निरज मोरये पुरस्कृत नांदगाव गाव मर्यादित दीपावली निमित्त अंगण रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर रांगोळी स्पर्धेत एकूण 27 स्पर्धकांनी व्हिडिओ पाठवले होते. आता लाईक शेअर करण्यासाठी चुरस निर्माण झाली असून सर्व महिलांचे लक्ष उद्या सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोण क्रमांक पटकावतो या कडे लागला आहे.        युट्यूब लिंक 23 ऑक्टोबर सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाली असून ती उद्या रविवार दिनांक 26 ऑक्टोबर सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात आली असून या रांगोळी स्पर्धेत लाईक व नंबर असल्याने महिलांमध्ये लाईक शेअर करण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक तासाला लाईक ने पुढे जाण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे चित्र नांदगाव येथे दिसून येत आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
हरकुळ बुद्रुक तीन उ.बा.ठा ग्रामपंचायत सदस्यां सह अनेक कार्यकर्त्यांचा  पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत  भाजपा प्रवेश. कणकवली ओम गणेश येथे, उबाठाचे शेकडो कार्यकर्ते भाजपात गावाचा विकास नितेश राणेच करू शकतात प्रवेश कर्त्यांचा विश्वास. कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील हरकुळ बृद्रूक येथील उ.बा.ठा ग्रामपंचायत सदस्यांनी आज  सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ओम गणेश, कणकवली येथे भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये ग्रामपंचायत सदस्य बाळू मोरये, उल्का घाडीगावकर, सादिका हूशेनशा पटेल, उमेश गोडे, रमेश मोडक, रमेश सावंत, सुमुक तारळेकर, नितीन तारळेकर, दिलीप सामंत, भिकाजी घाडीगांवकर आणि उदय घाडीगांवकर यांचा समावेश आहे. या वेळी गोट्या सावंत, मिलिंद मेस्त्री, राजू पेडणेकर, बुलंद पटेल, बालुल पटेल, अनिल कोचरे, चंद्रकांत परब आणि सर्फराज शेख आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रवेशामुळे कणकवली तालुक्यात भाजपची ताकद आणखी वाढल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांनी नमूद केले.

सिंधुदुर्ग today

इमेज
  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नौका वितरण कार्यक्रम २७ ऑक्टोबर रोजी मुंबईत  मासेमारी क्षेत्राला मोठा हातभार,१४ सहकारी संस्थांना मिळणार अद्ययावत समुद्री नौका २७ ऑक्टोबर रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दोन मच्छीमार सोसायटींना दिल्या जाणार बोटीच्या चावी खोल समुद्रातील मासेमारीला चालना देणारा महत्वपूर्ण उपक्रम. मुंबई प्रतिनिधी  महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २०० मिटर खोल मच्छिमारी साठी समुद्रातील मासेमारी नौका उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) अंतर्गत राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम (NCDC) कडून आर्थिक साहाय्य दिले जात असून, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून संबंधित योजने अंतर्गत राज्यातील सात सागरी जिल्ह्यांमधील एकूण १४ मच्छिमार सहकारी संस्थांची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. या मच्छीमार संस्थांना खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी अद्यावत सेवा सुविधांनी परिपूर्ण असलेल्या बोटीचे वितरण केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित भाई शहा यांच्या हस्ते सोमवार २७ ऑक्टोबर...

सिंधुदुर्ग today

इमेज
अक्षरवैभव साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी सायमन मार्टिन प्रभा प्रकाशन आणि अक्षरवैभव संस्थेतर्फे 16 नोव्हेंबर रोजी वैभववाडी येथे संमेलनाचे आयोजन प्रभा प्रकाशन आणि अक्षरवैभव संस्थेतर्फे पत्रकार परिषदेत माहिती वैभववाडी/प्रतिनिधी      वैभववाडीच्या साहित्य सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने पुढचं पाऊल पडावं म्हणून अक्षरवैभव साहित्य कला मंच या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. तथापि प्रभा प्रकाशन कणकवली आणि अक्षरवैभव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 16 नोव्हेंबर रोजी वैभववाडी एस. टी. स्टॅन्ड नजीक डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथील सभागृहात अक्षरवैभव साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी तथा यावर्षीच्या ख्रिश्चन मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष सायमन मार्टिन वसई यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती प्रभा प्रकाशनचे संचालक कवी अजय कांडर आणि अक्षरवैभवचे संस्थेचे अध्यक्ष प्रा एन एस पाटील, सचिव चेतन बोडेकर यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.          अक्षरवैभव साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमी येथील...

सिंधुदुर्ग today

इमेज
कासार्डे जिल्हा परिषद साठी नांदगाव येथील मोसिम महात इच्छूक  कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघासाठी नांदगाव तिठा येथील मोसिम खलिल महात हे युवा नेतॄत्त्व आणि भाजपचे कार्यकर्ते असलेले ओबीसी आरक्षण पडल्याने इच्छुक आहेत. प्रत्येक निवडणुकीत अग्रेसर सहभागी असतात. पक्षाकडे अधिकृत मागणी करणार असून तिकीट दिले तर निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे.       कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघात ओबीसी आरक्षण पडल्याने ओबीसी असलेल्या इच्छुकांत पदाधिकारी कार्यकर्ते यांची वाढ होत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
  शालन कांबळे स्मृती माणगाव परिषद गौरव पुरस्कार नांगरमुठी कादंबरीला जाहीर प्रभा प्रकाशनातर्फे पुरस्काराचे आयोजन : वैभववाडी येथे वितरण कणकवली/प्रतिनिधी     महाराष्ट्रातील गुणवंत नव्या साहित्यिकांना प्रेरणा देण्यासाठी प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे पुरस्कार योजनेचे आयोजन करण्यात येते. प्रभा प्रकाशनाच्या या वर्षीच्या शालन कांबळे स्मृती माणगाव परिषद गौरव कादंबरी पुरस्कारासाठी राधानगरी येथील कादंबरीकार पांडुरंग पाटील यांच्या दर्या प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या 'नांगरमुठी' या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. पाच हजार रुपये, स्मृति चिन्ह, शाल आणि ग्रंथ अशा स्वरूपाच्या या पुरस्काराने कादंबरीकार पाटील यांना नोव्हेंबर मध्ये वैभववाडी येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराची निवड नामवंत समीक्षाक डॉ. दत्ता घोलप आणि प्रभा प्रकाशनाचे संचालक कवी अजय कांडर यांनी केली.       प्रभा प्रकाशन कणकवली ही कोकणातील अग्रगण्य प्रकाशन संस्था. अल्प कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातील नव्या जुन्या लेखकांचे ग्रंथ प्रकाशित करून चांगलं लेखन अभिजात वाचक...

सिंधुदुर्ग today

इमेज
इतिहास असाच घडत नाही! बाळाच्या जन्माला २ दिवस... २५० किमीचा प्रवास... आणि एका आईने अशक्य ते शक्य केलं! तामिळनाडू /सोशल न्यूज आयुष्य तुमची किती कठीण परीक्षा घेऊ शकतं? एका स्त्रीसाठी 'आई' होणं हा सर्वात मोठा आनंद असतो, पण त्याच क्षणी तुमची स्वप्नं तुम्हाला साद घालत असतील तर? तामिळनाडूतील या महिलेसोबत असंच काहीसं घडलं. न्यायाधीशपदाच्या परीक्षेच्या अवघ्या ४८ तास आधी तिने एका बाळाला जन्म दिला. खरंतर, अशावेळी विश्रांती घेणं गरजेचं होतं. पण तिने आपलं स्वप्न सोडलं नाही. बाळंतपणानंतरची शारीरिक अवस्था सांभाळत, तिने आपल्या नवजात बाळासह तब्बल २५० किलोमीटरचा प्रवास केला आणि परीक्षा दिली! तिचा हा संघर्ष वाया गेला नाही. ती परीक्षा उत्तीर्ण झाली आणि 'तामिळनाडूची पहिली आदिवासी महिला न्यायाधीश' बनण्याचा ऐतिहासिक मान मिळवला. पण आश्चर्य वाटतं... एवढी मोठी प्रेरणादायी गोष्ट असूनही तिची कथा फारशी कुणाला माहित नाही. अशा खऱ्या 'सुपरमॉम'ची कहाणी प्रत्येकापर्यंत पोहोचलीच पाहिजे! या जिद्दी आईला आणि तिच्या यशाला आमचा सलाम! #प्रेरणादायी #आई #जिद्द #नारीशक्ती #तामिळनाडू #संघर्ष #Respect #Sup...

सिंधुदुर्ग today

इमेज
दीपावली निमित्त निरज मोरये आणि प्राची मोरये व त्याचे सर्व मित्र परिवार आणि सहकारी यांच्या कडून नांदगाव तिठा ब्रिज खाली  फराळांचे होणार वाटप. कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा ब्रिज खाली दिपावली निमित्त नांदगाव माजी उपसरपंच निरज मोरये आणि सौ. प्राची निरज मोरये यांच्या वतीने सोमवार दिनांक 20  ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9.30 वा. एक अनोखा उपक्रम आपण घरी फराळ खातोच परंतु सगळ्यांच्या समवेत फराळ खाण्याच आनंद किती वेगळा असेल या साठी फराळाचे वाटप करण्यात येणार आहे. सर्वांनी एकत्र येऊन फराळांचा आस्वाद घेण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन निरज मोरये यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी संगणकाची मदत होईल - विजय घरत.  नांदगाव प्राथमिक शाळेला प्रिमियर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे संगणक प्रदान. कणकवली : प्रतिनिधी  विद्यार्थ्यांना लहान वयात संगणकाची हाताळणी केल्यास पुढील जीवनात त्यांना फायदा होईल. या शाळेच्या शिक्षकांनी आपल्याकडे संगणक संचाची मागणी केली. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रिमियर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे संगणक संच देण्यात आला. यापुढे प्राथमिक आरोग्य केंद्र ला औषध पुरवठा व सामाजिक उपक्रम राबवले जातील. या भागात वह्या वाटपही आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी करतो.विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी संगणकाची मदत होईल असा विश्वास, संस्थेचे अध्यक्ष विजय घरत यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नांदगाव मधलीवाडी येथे प्रिमियर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे संगणक संच संस्थेचे अध्यक्ष विजय घरत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक उजळणीसाठी संगणकाची आवश्यकता होती. त्यानुसार पहिली ते सातवी 30 पटसंख्या असलेल्या या शाळेला संगणक संच प्रिमियर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे उपलब्ध करुन देण्यात आ...

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणे यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मागणी केली पूर्ण सिंधुदुर्ग आणि कणकवली येथे चार लांब पल्ल्याच्या जलद गाड्यांना थांबा पालकमंत्री नितेश राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विन कुमार वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर रेल्वे बोर्डाकडून निर्णय कणकवली प्रतिनिधी   केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन कुमार वैष्णव यांनी राज्याचे  कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना सिंधुदुर्गात थांबा देण्याची मागणी मान्य केली आहे.त्यानुसार सिंधुदुर्ग- ओरोस आणि कणकवली रेल्वे स्थानकांवर चार लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.  रेल्वे बोर्डाकडून १७ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार हा निर्णय लागू करण्यात आला आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार  नितेश राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विन कुमार वैष्णव यांच्याकडे मागणी केली होती त्यांचे हे प्रयत्न यशस्वी ठरले असून रेल्वेने सिंधुदुर्ग व कणकवली बस स्थानकावर मागणीप्रमाणे गाड्या थांबवण्याचा...

सिंधुदुर्ग today

इमेज
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेप्रकरणी दिपक चौगुलेची निर्दोष मुक्तता. अँड प्राजक्ता शिंदे यांनी पाहिले काम. कणकवली- प्रतिनिधी  दिनांक १०/०७/२०२४ रोजी लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेप्रकरणी दिपक चौगुले राहा- बावीचे भाटले, ता-कणकवली याची मे. विशेष सत्र न्यायाधीश ओरोस श्रीम. व्ही. एस. देशमुख यांनी दिनांक १७/१०/२०२५ रोजी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अँड. प्राजक्ता म.शिंदे, यांनी काम पाहिले. याबाबतची सविस्तर हकीकत अशी की,दिनांक १०/०७/२०२४ रोजी पिडीत अल्पवयीन मुलगी हि तिचे कॉलेजला जाणेकरिता नेहमीप्रमाणे घरातून निघून गेली. त्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलगी हि नेहमीच्या वेळेत घरी परत न आल्याने तिचे नातेवाईक यांनी तिचा शोध घेतला असता ती मिळून आलेली नाही. त्यामुळे तिचे अज्ञानाचा फायदा घेवून तिला कोणीतरी अज्ञात इसमाने कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून नेले बाबत फिर्यादी यांनी फिर्याद दिलेवरून दिनांक १३/०७/२०२४ रोजी कणकवली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं.२१४/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. तद्वंतर ...

सिंधुदुर्ग today

इमेज
  शेतकऱ्यांची दिवाळी गोड ; आंबा-काजू  नुकसान भरपाईच्या ९० कोटी विमा रक्कम वाटप सुरू  शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी विमा रक्कम जमा होणार;पालकमंत्री नितेश राणे  प्रशासन आणि विमा कंपनीची पालकमंत्र्यांनी  केली कानउघडणी  “शेतकऱ्यांपेक्षा आपल्यासाठी मोठं कोणीही नाही”- पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी  शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्यास थोडा विलंब झाला असला तरी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यास आम्ही यशस्वी झालो. याचा आनंद आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगतानाच प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यपद्धतीने पार पाडल्यास शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही,असे सांगत प्रशासन आणि विमा कंपनीची पालकमंत्री नितेश राणे यांनी कानउघडणी केली. शेतकऱ्यांना ९० कोटी रुपये आंबा काजू ची २०२४-२५ विमा नुकसान भरपाई  वितरण सुरू करण्यात आली आहे.त्या कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे बोलत होते.        सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि भारतीय कृषी बीमा कंपनी यांच्या संयुक्...

सिंधुदुर्ग today

इमेज
  न दोडामार्ग येथील मांस वाहतूक करणाऱ्या कार जळीत प्रकरणी तिघांना जामीन. अँड उमेश सावंत यांनी पाहिले काम. कणकवली / प्रतिनिधी दोडामार्ग पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या वीजघर चेकपोस्ट येथे पोलीस कर्मचारी परशुराम सावंत हे बकरा सदृश्य असलेले मांस वाहतूक करणारी स्विफ्ट कार घेऊन पोलीस स्टेशन येथे जात होते. यावेळी सदर गाडी अडवून ५० ते ६० लोकांच्या जमावाने गाडी फोडत आतील मांस रस्त्यावर फेकले. यावेळी स्विप्ट चालक निजामुद्दीन कुरेशी व पोलीस कर्मचारी श्री. सावंत याला मारहाण करत गाडी पेटवून दिल्याप्रकरणी अटकेत असल्या सीताराम उर्फ राज तांबे, महेश धर्णे व कलैया हिरेमठ यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्रमांक १ श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी ५० हजार रुपयांच्या सशर्त जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. आरोपींच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.४५ वा.च्या सुमारास बेळगाव येथून गोवा पासिंगची स्विफ्ट कार वीजघर चेक पोस्टवर आली. यावेळी गाडीमध्ये एकूण ४९  धडे असलेले सुमारे २८० किलो कातडी सोललेले मांस दिसून आले. सदरचे वाहन चौकशी करिता दोडामार्ग पोलीस स्टेशनला घेऊन जा...

सिंधुदुर्ग today

इमेज
शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचे आवाहन. सिंधुदुर्गनगरी,  (ऋषिकेश मोरजकर) :-  जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी  आपली शिधापत्रिका ऑनलाईन  करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे  यांनी केले आहे. सर्व शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचे शासनाचे निर्देश असून "आयुष्यमान भारत कार्ड" योजनेकरिता शिधापत्रिका ऑनलाईन असणे अनिवार्य आहे. या योजनेकरीता सर्व शिधापत्रिकाधारक पात्र असून जिल्ह्यातील सर्व  शिधापत्रिका ऑनलाईन करावयाच्या आहेत. परंतु अद्याप पर्यत सर्व शिधापत्रिका ऑनलाईन झालेल्या नाहीत. सर्व शिधापत्रिका धारक (NPH,केशरी, शुभ्र) यांनी आपली शिधापत्रिका ऑनलाईन करण्याकरीता संबंधित तहसिलदार कार्यालय,  शासनाची  rcms.mahafood.gov.in या वेबसाईट वरील पब्लिक लॉगीनचा वापर करुन किंवा CSC सेंटर मध्ये संपर्क करुन शिधापत्रिका ऑनलाईन करावयाची आहे. आपली शिधापत्रिका ऑनलाईन झाल्यानंतरच आपल्याला "आयुष्यमान भारत कार्ड" योजनेचा लाभ घेता येईल.    सर्व शिधापत्रिकाधारकांनी आपली शिधापत्रिका ऑन...

सिंधुदुर्ग today

इमेज
सणासुदीच्या काळात  जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यवसायिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन. सिंधुदुर्गनगरी, ऋषिकेश मोरजकर:-  सणासुदीच्या कालावधीमध्ये जनतेकडून मिठाई व इतर अन्न पदार्थ जसे खवा, मावा, घी, रवा, मैदा, आटा, खाद्यतेल, वनस्पती तेल इत्यादीची मागणी मोठ्याप्रमाणात केली जाते, त्याअनुषंगाने जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायीकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे  आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) मा.रा. घोसलवाड यांनी केले आहे.    आस्थापनेचा परिसर हा पर्यावरणीय दृष्टीने व किटकापासून संरक्षित व स्वच्छ असावा. कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक, नोंदणीधारक अन्न व्यावसायिकाकडून खरेदी करण्यात यावेत. अन्न पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, पाणी पिण्यायोग्य असल्याबाबत अहवाल प्राप्त करून घ्यावा. तयार अन्न पदार्थ हे स्वच्छ व सुरक्षित ठिकाणीच व्यवस्थित झाकूण ठेवावेत. आजारी व्यक्तीने अन्न पदार्थ हाताळू नयेत. मिठाई तयार करतांना केवळ फूडग्रेड साद्यरंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा (100 PPM पेक्षा कमी). अन्न पदा...

सिंधुदुर्ग today

इमेज
फळ पीक विमा नुकसान भरपाई वितरण कार्यक्रमाचे आयोजन पालकमंत्री नितेश राणे यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती योजनेमध्ये जिल्ह्यातील ४३ हजार आंबा - काजू बागायतदारांचा सहभाग सिंधुदुर्ग नगरी (ऋषिकेश मोरजकर) पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना, अंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत विमा नुकसान भरपाई वितरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरन्स हॉल येथे दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पालकमंत्री  नितेश राणे भूषवणार आहेत. पालकमंत्री नितेश राणे हे या कार्यक्रमासाठी दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित राहणार आहेत.  भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत जिल्ह्यातील ४३ हजार २१९  आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी एकूण १७,५७७ हेक्टर क्षेत्राचे विमा संरक्षण घेतले असून, त्यांना विमा नुकसान भरपाई वितरित करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत २०२४-२५ या अंबिया बहार हंगामासाठीचा संरक्षण कालावधी १५ मे २०२५ रोजी संपला असून, विमा नुकसान भरपाई अदा करण्याबाबत मंत्रालय, मुंबई येथे राज्याचे कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय घे...

सिंधुदुर्ग today

इमेज
नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी वैभव नाईक यांना अटकपूर्व जामीन मंजूर. अँड उमेश सावंत यांनी पाहिले काम.  कणकवली / प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील झाराप तिठा येथे झालेल्या अपघाताच्यावेळी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सावंतवाडीचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंखे यांचे अडनाव विचारून मारहाण केली. तसेच मारून टाकण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांना अतिरीक्त सत्र तथा विशेष न्यायाधिश (अॅट्रॉसिटी) श्रीमती डी. एस. देशमुख यांनी ५० हजार रुपये जाच मुचलक्याचा सशर्थ जामिन मंजूर केला. श्री. नाईक यांच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी झाराप तिठा येथे महामार्गावर असलेल्या अनधिकृत मिडलकटमुळे अपघात झाला. यात एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. यावेळी गावकरी जमा झाले होते. त्याचवेळी माजी आमदार वैभव नाईक हे सावंतवाडी दौऱ्यासाठी जात असताना त्याठिकाणी थांबले. तेवढ्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी उपअभियंता वृषाली पाटील व फिर्यादी त्याठिकाणी पोहोचले. यावेळी श्रीमती पाटील यांना तुम्ही बाजूला व्हा असे ...

सिंधुदुर्ग today

इमेज
कासार्डे जिल्हा परिषद साठी नांदगाव विभागातून निरज मोरये इच्छुक. कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  कणकवली तालुक्यातील कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातओबीसी सर्वसाधारण आरक्षण पडल्याने नांदगाव माजी उपसरपंच निरज मोरये इच्छुक आहेत. जिल्हा परिषद उमेदवारी अर्ज संदर्भात चाचपणी  सर्व मित्र परिवार, हितचिंतक , वरीष्ठ मंडळी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन करणार असल्याचे निरज मोरये यांनी सांगितले आहे.      कासार्डे, ओझरम,दारुम असा तिनं गावांचा पंचायत समिती एक मतदार संघ तर दुसरा नांदगाव पंचायत समिती मतदार संघात नांदगाव, तोंडवली, बावशी, असलदे,कोळोशी , आयनल असा दुसरा पंचायत समिती मतदार संघ असा आहे. मागच्या वेळी कासार्डे जिल्हा परिषद सदस्य म्हणून संजय देसाई भरघोस मतांनी निवडून आले होते.        नीरज मोरये हे सर्व जनसंपर्क असलेले युवा कार्यकर्ते असून त्यांनी यापूर्वी नांदगाव उपसरपंच पद 2017 ते 2022 पर्यंत भुषविले आहे.तसेच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात दबदबा आहे आता कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघात ओबीसी आरक्षण पडल्याने निरज मोरये जोरदार इच्छुक असून भारतीय जनता पक्षाक...

सिंधुदुर्ग today

इमेज
प्रायोगिक रंगभूमीचे ज्येष्ठ दिग्दर्शक रघुनाथ कदम यांचे निधन   कणकवली/प्रतिनिधी     कणकवलीच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अविभाज्य भाग असलेले मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक रघुनाथ कदम (वय ६७ गाव - वळीवंडे - देवगड) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, सुना, भाऊ असा परिवार आहे      रघुनाथ कदम हे आपल्या देवगड वळीवंडे गावी मुंबईहून आले होते. त्यांच्या छातीत दुखायला लागल्यामुळे एका खाजगी रुग्णालयात स्वतःहून ते दाखल झाले. मात्र तिथेच त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह मुंबई येथे हलविण्यात आला असून उद्या 15 ऑक्टोंबर रोजी सकाळी मुंबई येथे त्यांचे अंत्यविधी करण्यात येणार आहेत.सुमारे 45 वर्ष रघुनाथ कदम हे मुंबई आणि कोकणात प्रायोगिक रंगभूमीवर निष्ठेने कार्यरत होते. सध्या त्यांची मुंबईच्या रंगभूमीवर कवी अजय कांडर लिखित युगानुयुगे तूच आणि कळत्या नकळत्या वयात ही दोन नाटके चालू आहेत. तर युगानुयुगे तूच हे त्यांनी दिग्दर्शित केलेले नाटक मुंबई दूरदर्शननेही सादर केले होते.   ...

सिंधुदुर्ग today

इमेज
जिल्हा परिषद ,पंचायत समिती आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी  (ऋषिकेश मोरजकर) :-  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम,1961 (सन 1962 चा अधिनियम,5)चे तरतुदी अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणातील एकूण सदस्य संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच स्त्रियांकरिता (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, सर्वसाधारण स्त्रिंयासह) राखून ठेवण्यात आलेले निवडणूक विभाग व निर्वाचक गणाबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग  यांच्या  दिनांक 13 ऑक्टोंबर 2025 च्या प्रारुप आरक्षणाची अधिसूचनेची प्रत, प्रसिध्द करण्यात आली असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे प्र. उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांनी दिली आहे.  या आरक्षणाची माहिती पाहण्यासाठी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग  तसेच वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव पंचायत समिती साठी प्राची निरज मोरये इच्छुक. नांदगाव माजी उपसरपंच निरज मोरये सौभाग्यवतीच्या उमेदवारी साठी तयारीला. कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचायत समिती सदस्य पदासाठी 2017 नंतर होणाऱ्या या निवडणुकीत पुन्हा एकदा ओबीसी महीला राखीव आरक्षण पडले आहे. यावेळी 2017 वेळी नांदगाव पंचायत समिती मधून हर्षदा वाळके या विजयी झाल्या होत्या आता पुन्हा एकदा या मतदारसंघात ओबीसी राखीव महिला आरक्षण पडल्याने हर्षदा वाळके यांचे नाव चर्चेत आहे . याबाबत सर्व ठिकाणी चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच या जागेसाठी नव्याने नांदगाव माजी उपसरपंच निरज मोरये यांच्या सौभाग्यवती प्राची निरज मोरये जोरदार इच्छुक असून निरज मोरये यांनी पत्नीचे ओबीसी कागदपत्रे जमवायला सुरुवात केली आहे.निरज मोरये हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असून ते पक्षाकडे अधिकृत मागणी करणार असल्याचे समजते.

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवलीत वारकरी संप्रदायाचा 9 नोव्हेंबर भव्य दिंडी सोहळा  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 व्या जयंतीवर्ष आणि  संत तुकाराम महाराज यांच्या 350 व्या वैकुंठ गमनाच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन मृदुंग वादक, टाळकरी, विणेकरी, तुळस व कलशासह हजारो वारकऱ्यांचा असणार सहभाग कणकवली प्रतिनिधी  सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदायाच्या वतीने रविवार 9 नोव्हेंबर 2025 रोजी, कणकवली येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 व्या जयंतीवर्ष आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाच्या 350 व्या वर्षानिमित्त कणकवली शहरात वारकरी सांप्रदाय सिंधुदुर्ग यांच्यावतीने भव्य "वारकरी दिंडी" चे आयोजन करण्यात आले आहे. एसटी वर्कशॉप येथील गणेश मंदिर येथून ही दिंडी परमपूज्य भालचंद्र महाराज मठापर्यंत जाणार आहे. या वारकरी दिंडीत 350 मृदुंग वादक, तेवढेच टाळकरी,विणेकरी, तुळस, कलश घेऊन या वारीत सहभागी होणार आहे. न भूतो न भविष्यती अशी ही वारकरी दिंडी कणकवली येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.  सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग यांची नुकतीच ...

सिंधुदुर्ग today

इमेज
अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंच, वैभववाडीच्या अध्यक्षपदी प्रा.एस.एन.पाटील तर सचिवपदी चेतन बोडेकर.  वैभववाडीच्या साहित्य कलाक्षेत्राला चालना देण्यासाठी नव्या संस्थेची स्थापना. वैभववाडी/प्रतिनिधी       वैभववाडी शहराच्या साहित्य कला क्षेत्राला चालना देण्यासाठी अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचची स्थापना करण्यात आली आहे. सदर संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.एस.एन.पाटील तर सचिवपदी चेतन बोडेकर यांची निवड करण्यात आली असून येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत संस्था स्थापन करणे, त्याचा उद्देश ठरविणे आणि कार्यकारणी निश्चित करणे यावर सविस्तर चर्चा करून यासंदर्भात सर्वानुमते निर्णय घेण्यात आले.      अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंच स्थापनाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यातील लेखक - कवी व साहित्यप्रेमींची बैठक वैभववाडी येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीला रवींद्र पवार, प्रा. एस. एन.पाटील, सुधाकर पुरीबुवा, चेतन अंबाजी बोडेकर, प्रफुल्ल जाधव, संदेश तुळसणकर, मारुती कांबळे, शैलेंद्रकुमार परब उपस्थित होते. यावेळी वैभववाडी शहरातील साहित्यिक कला क्षेत्राला अधिक गतिमान करून नव्या साहि...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे दीपावली निमित्त आँनलाईन रांगोळी स्पर्धा. कणकवली प्रतिनिधी   सिंधुदुर्ग टुडे डिजिटल न्यूज चॅनल तसेच नांदगाव माजी उप सरपंच निरज मोरये सौ. प्राची निरज मोरये यांच्या सहकार्याने नांदगाव गाव मर्यादित दीपावली निमित्त अंगण रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सदर रांगोळी स्पर्धेत स्पर्धकांनी दीपावली निमित्त आपल्या अंगणामध्ये रांगोळी काढून त्याचा एक मिनिटाचा व्हिडिओ उभ्या मोबाईल ने काढून तो 90 96 56 44 10 या व्हाट्सअप नंबर वर पाठवावा        सदर व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2025 असून व्हिडिओ पाठवल्यानंतर त्या व्हिडिओच्या प्रत्येक व्हिडिओ ची लिंक स्पर्धकाला पाठवली जाणार आहे. ज्या दिवशी व्हिडिओची लिंक पाठवली जाणार आहे त्यापासून सलग पाच दिवस आपण ती लिंक  सर्वांना शेअर करून लाईक, शेअर सबस्क्राईब, व्ह्यू जास्तीत जास्त ज्या स्पर्धकाचे होतील अनुक्रमे क्रमांक काढले जाणार आहेत व अनुक्रमे तीन विजेत्या स्पर्धकांना पैठणी साडी देण्यात येणार आहे तसेच सहभागी स्पर्धकांनाही आकर्षक भेटवस्तू दिले जाणार आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
प्रभा प्रकाशनाचा आवानओल पुरस्कार श्वेतल परब यांच्या 'कोल्हाळ' कादंबरीला जाहीर. नोव्हेंबर महिन्यात वैभववाडी येथे पुरस्काराचे वितरण. कणकवली/प्रतिनिधी     अल्प कालावधी कोकणात अग्रेसर ठरलेल्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे दरवर्षी एका उत्कृष्ट साहित्यकृतीला प्रभावती कांडर स्मृती आवानओल पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षीच्या सदर पुरस्कारासाठी लोकवाङ्मय गृह मुंबईतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या सावंतवाडी येथील कादंबरीकार श्वेतल परब यांच्या 'कोल्हाळ' कादंबरीची निवड करण्यात आली आहे.          तीन हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ अशा स्वरूपाचा हा पुरस्कार नोव्हेंबर मध्ये वैभववाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात श्वेतल परब यांना देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रभा प्रकाशन ही कोकणातील लोकप्रिय प्रकाशन संस्था असून मागील चार वर्षाच्या कालावधीमध्ये 40 ग्रंथ प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आले आहेत. यात कोकणातील स्थानिक लेखकांची लेखन गुणवत्ता अभिजात साहित्य वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक लेखकांचे ग्रंथ अग्रक्रमाने प्रकाशित केले जात आहेत. याच पा...