सिंधुदुर्ग today



नांदगाव पंचायत समिती साठी प्राची निरज मोरये इच्छुक.

नांदगाव माजी उपसरपंच निरज मोरये सौभाग्यवतीच्या उमेदवारी साठी तयारीला.

कणकवली (ऋषिकेश मोरजकर) 

कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचायत समिती सदस्य पदासाठी 2017 नंतर होणाऱ्या या निवडणुकीत पुन्हा एकदा ओबीसी महीला राखीव आरक्षण पडले आहे. यावेळी 2017 वेळी नांदगाव पंचायत समिती मधून हर्षदा वाळके या विजयी झाल्या होत्या आता पुन्हा एकदा या मतदारसंघात ओबीसी राखीव महिला आरक्षण पडल्याने हर्षदा वाळके यांचे नाव चर्चेत आहे . याबाबत सर्व ठिकाणी चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच या जागेसाठी नव्याने नांदगाव माजी उपसरपंच निरज मोरये यांच्या सौभाग्यवती प्राची निरज मोरये जोरदार इच्छुक असून निरज मोरये यांनी पत्नीचे ओबीसी कागदपत्रे जमवायला सुरुवात केली आहे.निरज मोरये हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असून ते पक्षाकडे अधिकृत मागणी करणार असल्याचे समजते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today