सिंधुदुर्ग today



नांदगाव येथील दीपावली निमित्त आँनलाईन रांगोळी स्पर्धेत पहायला मिळत आहे चुरस.

कणकवली प्रतिनिधी

 सिंधुदुर्ग टुडे डिजिटल न्यूज चॅनल यांच्या वतीने तसेच नांदगाव माजी उप सरपंच निरज मोरये सौ. प्राची निरज मोरये पुरस्कृत नांदगाव गाव मर्यादित दीपावली निमित्त अंगण रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर रांगोळी स्पर्धेत एकूण 27 स्पर्धकांनी व्हिडिओ पाठवले होते. आता लाईक शेअर करण्यासाठी चुरस निर्माण झाली असून सर्व महिलांचे लक्ष उद्या सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोण क्रमांक पटकावतो या कडे लागला आहे.

       युट्यूब लिंक 23 ऑक्टोबर सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाली असून ती उद्या रविवार दिनांक 26 ऑक्टोबर सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात आली असून या रांगोळी स्पर्धेत लाईक व नंबर असल्याने महिलांमध्ये लाईक शेअर करण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक तासाला लाईक ने पुढे जाण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे चित्र नांदगाव येथे दिसून येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today