सिंधुदुर्ग today

 


कणकवली पोलीस स्टेशन च्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पोलीस व नागरिकांची दौड.

पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या सहीत सर्व पोलीस, पोलीस पाटील, होमगार्ड, विद्यार्थी, नागरिकांनी घेतला सहभाग 

कणकवली (ऋषिकेश मोरजकर) 

आज दिनांक 31 ऑक्टोबर ला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त (एकता दिन) सकाळी 07.30 ते 08.15  वा. चे मुदतीत कणकवली पटवर्धन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी दौड घेण्यात आली. सदर दौडमध्ये कणकवली पोलीस निरीक्षक श्री. तेजस नलवडे, सर्व पोलीस स्टेशन चे अधिकारी अंमलदार, विद्यामंदिर हायस्कूल कणकवली चे विद्यार्थी शिक्षक, तालुक्यातील पोलीस पाटील, होमगार्ड  तसेच कणकवली शहरातील नागरिक असे एकूण सुमारे 100-150 च्या उपस्थितीत दौड घेण्यात आली.     या दौड वेळी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथील वैद्यकीय पथक व ॲम्बुलन्स दौड सोबत उपस्थित ठेवण्यात आलेली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today