सिंधुदुर्ग today
कासार्डे जिल्हा परिषद साठी नांदगाव विभागातून निरज मोरये इच्छुक.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातओबीसी सर्वसाधारण आरक्षण पडल्याने नांदगाव माजी उपसरपंच निरज मोरये इच्छुक आहेत. जिल्हा परिषद उमेदवारी अर्ज संदर्भात चाचपणी सर्व मित्र परिवार, हितचिंतक , वरीष्ठ मंडळी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन करणार असल्याचे निरज मोरये यांनी सांगितले आहे.
कासार्डे, ओझरम,दारुम असा तिनं गावांचा पंचायत समिती एक मतदार संघ तर दुसरा नांदगाव पंचायत समिती मतदार संघात नांदगाव, तोंडवली, बावशी, असलदे,कोळोशी , आयनल असा दुसरा पंचायत समिती मतदार संघ असा आहे. मागच्या वेळी कासार्डे जिल्हा परिषद सदस्य म्हणून संजय देसाई भरघोस मतांनी निवडून आले होते.
नीरज मोरये हे सर्व जनसंपर्क असलेले युवा कार्यकर्ते असून त्यांनी यापूर्वी नांदगाव उपसरपंच पद 2017 ते 2022 पर्यंत भुषविले आहे.तसेच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात दबदबा आहे आता कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघात ओबीसी आरक्षण पडल्याने निरज मोरये जोरदार इच्छुक असून भारतीय जनता पक्षाकडे अधिकृतपणे मागणी करणार असल्याचे समजते. तसेच त्यांनी सर्व स्तरातून या विभागात चाचपणी सुरू केली आहे.निरज मोरये यांच्या मागे कोणाचा वरदहस्त आहे का ? याबाबत चर्चा सुरू आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा