सिंधुदुर्ग today


अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेप्रकरणी दिपक चौगुलेची निर्दोष मुक्तता.

अँड प्राजक्ता शिंदे यांनी पाहिले काम.

कणकवली- प्रतिनिधी 

दिनांक १०/०७/२०२४ रोजी लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेप्रकरणी दिपक चौगुले राहा- बावीचे भाटले, ता-कणकवली याची मे. विशेष सत्र न्यायाधीश ओरोस श्रीम. व्ही. एस. देशमुख यांनी दिनांक १७/१०/२०२५ रोजी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अँड. प्राजक्ता म.शिंदे, यांनी काम पाहिले.

याबाबतची सविस्तर हकीकत अशी की,दिनांक १०/०७/२०२४ रोजी पिडीत अल्पवयीन मुलगी हि तिचे कॉलेजला जाणेकरिता नेहमीप्रमाणे घरातून निघून गेली. त्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलगी हि नेहमीच्या वेळेत घरी परत न आल्याने तिचे नातेवाईक यांनी तिचा शोध घेतला असता ती मिळून आलेली नाही. त्यामुळे तिचे अज्ञानाचा फायदा घेवून तिला कोणीतरी अज्ञात इसमाने कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून नेले बाबत फिर्यादी यांनी फिर्याद दिलेवरून दिनांक १३/०७/२०२४ रोजी कणकवली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं.२१४/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. तद्वंतर दिनांक ११/०९/२०२४  रोजी अल्पवयीन मुलगी पोलिसांना सापडून आली पोलीसांनी तिचा जबाब नोंदविला. त्यानुसार नमूद गुन्ह्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ६४(२)(i), ६९ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,८,१२ प्रमाणे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. पिडीतेने दिलेल्या जबाबानुसार दिनांक १०/०७/२०२४ रोजी दिपक चौगुले हा गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने देवगड येथे घेवून गेला. अल्पवयीन मुलीने शारीरिक संबधाना नकार दिला असताना देखील आरोपीने तिचेवर जबरदस्तीने शारीरिक संबध ठेवले. 

तपासाअंती आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र विशेष सत्र न्यायालय ओरोस येथे पाठविण्यात आले होते. सदर केसची सुनावणी मे. विशेष सत्र न्यायालय ओरोस यांचे समोर पूर्ण झाली. पुराव्याअंती दिपक चौगुले याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने अँड. प्राजक्ता शिंदे यांनी काम पाहिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today