सिंधुदुर्ग today

नांदगाव येथे दीपावली निमित्त आँनलाईन रांगोळी स्पर्धा.

कणकवली प्रतिनिधी 

 सिंधुदुर्ग टुडे डिजिटल न्यूज चॅनल तसेच नांदगाव माजी उप सरपंच निरज मोरये सौ. प्राची निरज मोरये यांच्या सहकार्याने नांदगाव गाव मर्यादित दीपावली निमित्त अंगण रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सदर रांगोळी स्पर्धेत स्पर्धकांनी दीपावली निमित्त आपल्या अंगणामध्ये रांगोळी काढून त्याचा एक मिनिटाचा व्हिडिओ उभ्या मोबाईल ने काढून तो 90 96 56 44 10 या व्हाट्सअप नंबर वर पाठवावा 

      सदर व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2025 असून व्हिडिओ पाठवल्यानंतर त्या व्हिडिओच्या प्रत्येक व्हिडिओ ची लिंक स्पर्धकाला पाठवली जाणार आहे. ज्या दिवशी व्हिडिओची लिंक पाठवली जाणार आहे त्यापासून सलग पाच दिवस आपण ती लिंक  सर्वांना शेअर करून लाईक, शेअर सबस्क्राईब, व्ह्यू जास्तीत जास्त ज्या स्पर्धकाचे होतील अनुक्रमे क्रमांक काढले जाणार आहेत व अनुक्रमे तीन विजेत्या स्पर्धकांना पैठणी साडी देण्यात येणार आहे तसेच सहभागी स्पर्धकांनाही आकर्षक भेटवस्तू दिले जाणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today