सिंधुदुर्ग today
नांदगाव ची सुकन्या सेरेना म्हसकर हिने कबड्डी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला मिळवून दिले सुवर्णपदक.
विमानतळावर झालं जंगी स्वागत.
सिंधुदुर्ग (ऋषिकेश मोरजकर)
सिंधुदुर्ग जिल्हा कणकवली तालुक्यातील नांदगाव मधली वाडी येथील सुकन्या कुमारी सेरेना सचिन म्हसकर हिने नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या एशियन युथ गेम्स कबड्डी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तिचे विमानतळावर आगमन होताच भारतामध्ये जंगी स्वागत करण्यात आले भारत माता की जय ... वंदे मातरम् अशा घोषणाही देण्यात आल्या.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कणकवली तालुक्यातील नांदगाव मधली वाडी येथील सुकन्या कुमारी सेरेना सचिन मेघाली म्हसकर सध्या भांडुप मुंबई येथे वडिलांच्या नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे . सध्या दहावी इयत्तेमध्ये शिकत असतानाच वडील सचिन म्हसकर स्वतः कबड्डीपटू तसेच आई मेघाली ही सुद्धा कबड्डीपटू या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगी कुमारी सेरेना ही पण लहानपणापासूनच कबड्डीचे धडे गिरवायला लागले.
सेरेनाची आई शिवछत्रपती पुरस्कार विजेती ठरली आहे. फर्स्ट एशियन गोल्ड मेडलिस्ट कबड्डी सेरेनाची आई भारताची उपकर्णधार ही आहे. अशा मुळे कबड्डीमध्ये हा हा म्हणताना महाराष्ट्र संघामधून चार वेळा प्रतिनिधित्व केले होते. मुंबई उपनगर वरून तिनं वेळा प्रतिनिधित्व केलं होतं आणि आता नुकतीच आंतरराष्ट्रीय झालेल्या कबड्डी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्याने सेरेनाचा भारतभर जयजयकार होत आहे.
कणकवली तालुक्यातील नांदगाव मधली वाडी हे त्याचं गाव असल्याने या गावांमधूनही अभिनंदनचा वर्षाव तिच्यावर होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा