सिंधुदुर्ग today
नांदगाव आँनलाईन रांगोळी स्पर्धेत वर्षा बापर्डेकर हिने पटकाविला प्रथम क्रमांक.
अपर्णा तेली व्दितीय तर ईशा बिडये तृतीय.
कणकवली प्रतिनिधी
सिंधुदुर्ग टुडे डिजिटल न्यूज चॅनल यांच्या वतीने तसेच नांदगाव माजी उप सरपंच निरज मोरये व सौ. प्राची निरज मोरये पुरस्कृत नांदगाव गाव मर्यादित दीपावली निमित्त अंगण रांगोळी स्पर्धेत नांदगाव वाघाची वाडी येथील कु. वर्षा दिलिप बापर्डेकर हिने १३६० लाईक मिळवित प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सौ.अपर्णा अमोल तेली यांनी १००१ लाईक मिळवित व्दितीय क्रमांक तर सौ. ईशा हरिश्चंद्र बिडये यांनी ७१७ लाईक मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
दिपावली निमित्त नांदगाव येथे अंगण रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर रांगोळी स्पर्धेत एकूण 27 स्पर्धकांनी व्हिडिओ पाठवले होते. आता लाईक शेअर करण्यासाठी अगदी आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत चुरस निर्माण झाली होती. सुयश संपादन केलेल्या अनुक्रमे तीन विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. लवकरच पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित आयोजित करण्यात येणार आहे.
यशस्वी अनुक्रमे तीन विजेत्या स्पर्धकांचे तसेच सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन सिंधुदुर्ग today डिजिटल न्यूज चॅनल चे संपादक ऋषिकेश मोरजकर व नांदगाव माजी उपसरपंच निरज मोरये यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा