सिंधुदुर्ग today


नांदगाव माजी उपसरपंच निरज मोरये यांचा भाजपला सोडचिठ्ठी.

मंत्री उदय सामंत आणि आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत  शिवसेनेत प्रवेश.

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव माजी उपसरपंच व भाजपाचे कार्यकर्ते निरज मोरये यांचा आज मंत्री उदय सामंत तसेच आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे शिवसेनेत प्रवेश झाला आहे त्यांच्यासोबत आज नांदगाव ग्रामपंचायत सदस्य विनोद मोरये तसेच इतर कार्यकर्त्यांनीही शिवसेनाचा धनुष्य हाती घेतला आहे.

      या प्रवेशामध्ये नीरज मोरये यांच्या सहित ग्रामपंचायत सदस्य विनोद मोरये , सिद्धेश मोरये, रामचंद्र मोरये ,निलेश मोरये काही कार्यकर्ते आदींनी प्रवेश केला आहे.

      कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघात ओबीसी आरक्षण पडल्याने निरज मोरये इच्छुक होते. आता त्यांना या मतदारसंघात जिल्हा परिषद ची उमेदवारी मिळणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या मतदार संघात भाजपा विरुद्ध शिवसेना अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today