सिंधुदुर्ग today
ओटव धरणातून प्रस्तावित कालव्याच्या मागणीची प्रशासनाने घेतली दखल ओटव धरणातून प्रस्तावित नांदगाव – असलदे कालव्याचे काम तातडीने करण्याचे आदेश जनता दरबारातून असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी केली होती मागणी. सिंधुदुर्ग ( ऋषिकेश मोरजकर) ओटव धरणातून प्रस्तावित कालव्याच्या कामाच्या मागणीची प्रशासनाने दखल घेतली असून ओटव धरणातून प्रस्तावित नांदगाव – असलदे कालव्याचे काम तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. याबाबत ओरस येथे झालेल्या जनता दरबारातून असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी मागणी केली होती. त्या मागणी ला यश मिळाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जनता दरबार 12 ऑगस्ट 2024 रोजी ओरोस येथील जिल्हा नियोजनच्या सभागृहात आयोजित केला होता. या जनता दरबारात ओटव धरणातून प्रस्तावित नांदगाव – असलदे कालव्याचे काम तातडीने करावे. त्या कालव्याचा असलदे गावातील शेतक-यांसाठी लाभ होईल. त्या कालव्याचे नियोजन करावे , अशी मागणी लेखी प्रत्राद्वारे केली होती. त्या अनुषंगाने ...