सिंधुदुर्ग today



"तुमचा लाडका आमदार तुमच्या दारी"

कुणकेश्वर येथून श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी सुरू करणार अभियान. 

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री नितेश राणे हे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या पवित्र दिवशी श्री देव कुणकेश्वराची पूजा करून 

"तुमचा लाडका आमदार तुमच्या दारी" या आपल्या जनसंपर्क मोहिमेला सुरुवात करणार आहेत. आपल्या आमदारकीच्या दहा वर्षाच्या कालावधीत विकास कामांचा लेखाजोखा या निमित्ताने जनतेसमोर मांडला जाणार असून जनतेच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या जाणार आहेत या काळात तीन तालुक्यातील गावांना भेटी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून कणकवली देवगड व वैभववाडी तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यां समवेत मतदारसंघातील जनतेशी संवाद साधून आशीर्वाद घेतले जाणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today