सिंधुदुर्ग today
"शिवसेना नेते खासदार श्री.संजय राऊत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर"
संदेश पारकर पारकर यांची माहिती
कणकवली /प्रतिनिधी
शिवसेना नेते खासदार श्री.संजय राऊत हे मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणार असून त्यांचा नियोजित दौरा खालीलप्रमाणे आहे.सकाळी १०.०० वा.,चिपी विमानतळ येथे आगमन.सकाळी १०.३० वा.मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जागेची पाहणी. सकाळी ११.०० वा.कोळंब ता. मालवण येथे समर्थ मंगल कार्यालय येथे शिवसैनिकांचा मेळावा. दुपारी २.०० वा.मालवण शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद.तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम शिवप्रेमी, शिवसेना, युवासेना, महिला, महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले आहे..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा