सिंधुदुर्ग today




ओटव धरणातून प्रस्तावित कालव्याच्या मागणीची प्रशासनाने घेतली दखल

ओटव धरणातून प्रस्तावित नांदगाव – असलदे कालव्याचे काम तातडीने करण्याचे आदेश 

जनता दरबारातून असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी केली होती मागणी.

सिंधुदुर्ग ( ऋषिकेश मोरजकर) 

ओटव धरणातून प्रस्तावित कालव्याच्या कामाच्या मागणीची प्रशासनाने दखल घेतली असून ओटव धरणातून प्रस्तावित नांदगाव – असलदे कालव्याचे काम तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. याबाबत ओरस येथे झालेल्या जनता दरबारातून असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी मागणी केली होती. त्या मागणी ला यश मिळाले आहे.

              सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जनता दरबार 12 ऑगस्ट 2024 रोजी ओरोस येथील जिल्हा नियोजनच्या सभागृहात आयोजित केला होता.  या जनता दरबारात ओटव धरणातून प्रस्तावित नांदगाव – असलदे कालव्याचे काम तातडीने करावे. त्या कालव्याचा असलदे गावातील शेतक-यांसाठी लाभ होईल. त्या कालव्याचे नियोजन करावे , अशी मागणी लेखी प्रत्राद्वारे केली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी संबंधित कालव्याच्या कामाबाबत अंतिम अहवाल 7 दिवसाच्या आत पाठवण्याची सुचना कार्यकारी अभियंता लघू पाटबंधारे विभाग यांना केली होती. याबाबत माझ्याशी या खात्याचे उपअभियंता मंगेश माणगांवकर यांनी दुरध्वनीद्वारे चर्चा करत पुढील महिन्याभरात आपल्या ग्रामपंचायतमध्ये येवून शेतक-यांशी संवाद साधून संबंधित कालव्याचा लाभ कशाप्रकारे देता येईल. याबाबत बैठक घेवून मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन दिले आहे . तरी सर्व गावातील शेतक-यांनी , सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या गावाची एकजुट ठेवून हा लढा पुढे नेण्यासाठी पाठीशी रहावे. मी केलेल्या तक्रारीची जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेतल्याबद्दल पालकमंत्री व प्रशासनाचे आभारी असल्याचे भगवान लोके यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today