सिंधुदुर्ग today




कासार्डेत प्रमोद जठार मित्रमंडळाच्यावतीने १,११,१११ ची भव्य दहीहंडी 

ऋषिकेश मोरजकर| कणकवली 

          सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची दहीहंडी समजल्या जाणाऱ्या  कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील भाजपा प्रदेश चिटणीस   तथा माजी आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्यावतीने मंगळवार   दि. २७ ऑगस्ट  २०२४ रोजी दुपारी २ ते रात्रौ १० या वेळेत गोपाळकाल्यानिमित्त कासार्डे तिठा येथील महामार्गनजीक  पटांगणामध्ये भव्य  दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रम प्रसंगी  मा. केंद्रीय मंत्री  तथा  रत्नागिरी - सिंधुदुर्ग  लोकसभा मतदार संघाचे  खासदार  नारायणराव राणे, सार्व.बांधकाम मंत्री  तथा  पालकमंत्री  रवींद्र चव्हाण , भाजप  प्रदेश   सचिव निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत  आदी नेत्यांसह  भाजपा  प्रदेश चिटणीस  तथा माजी आमदार प्रमोद जठार व दोन्ही  जिल्हयातील  विविध भाजपचे मान्यवर नेते पदाधिकारी - कार्यकर्ते व गाव मानकऱ्यांच्या उपस्थितीत  रु १,११,१११ रकमेच्या  भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या मंडळाचे हे नॉनस्टॉप  १२  वे वर्ष असून यावेळी विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवामध्ये सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा पथकांना सहभागी होता येईल. 

          प्रमोद जठार मित्रमंडळाच्यावतीने दरवर्षी मोठया धुमधडाक्यात  मानाची दहीहंडी  म्हणून साजरी  होते  त्यामुळे   याही वर्षी मोठ्या जल्लोषात  साजरी  होणार असून  आपल्याकडील ग्रामीण भागातील गोविंदा पथकांना या दहीहंडी उत्सवात सहभागीं होता यावें त्यांना यातून आनंद,उत्साह, व आपले कौशल्य दाखविता यावे त्यातूनही अनेक नवीन गोविंदा पथके निर्माण होऊन त्यांना प्रोत्साहन व बक्षिसे मिळाविता यावित या उद्देशाने  सिंधुदुर्ग व रत्नागिरी अशा दोन जिल्ह्यातील या गोविंदा पथकांसाठी दहीहंडीचे  आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी आठ थरांचे मनोरे रचून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला रोख रु १ लाख ११  हजार १११  रुपये व  आकर्षक कोकण दूध चषक देण्यात येणार आहे.तर यावेळी चार थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना रोख २ हजार २२२ रुपये, पाच थरांची सलामी देणाऱ्यासाठी ३ हजार ३३३ रुपये,सहा थरांची सलामी देणाऱ्यासाठी ४ हजार ४४४ रुपये,सात थरांची सलामी देणाऱ्यासाठी ५ हजार ५५५ रुपये व प्रत्येकी आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल.यावेळी डी जे , ढोलपथकांच्या  गजरासह दुपारी २.३० वा. गावातील स्थानिक प्रतिष्ठीत मानकरी व पदाधिकारी- कार्यकर्त्यांच्या हस्ते दहीहंडीचा श्रीफळ वाढवून शुभारंभ होणार आहे त्याचबरोबर  सायं ४ वाजल्यानंतर खास रसिक प्रेक्षकांसाठी सध्या महाराष्ट्र  व महाराष्ट्राबाहेर गाजतं असलेला कोल्हापूर येथील केदार  निर्मित   ऑर्क्रेस्ट्रा किशोरकुमार  डान्स म्युझिकल नाईट  हा जुन्या नव्या मराठी-हिंदी  रिमिक्स, दिलखेचक लावण्या,अत्याधुनिक साउंड सिस्टीम- स्पेशल लेझर- शार्पी   नेत्रदीपक  लाईट इफेक्टस, सुमधुर  संगीत, वन्समोअर  नृत्यगीतांचा जबरदस्त हंगामा- व्हरायटी शो असलेला बहारदार कार्यक्रम होणार आहें. सदर  कार्यक्रमामध्ये  प्रेक्षकांसाठी  लकी ड्रॉ  कुपन आकर्षक भेटवस्तू  चे आयोजन करणेत आले आहे. तरी या भव्य दहीहंडी उत्सवामध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हयातील गोविंदा पथकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे यासाठी इच्छुकांनी  माहितीसाठी व  नावनोंदणीसाठी प्रमोद जठार मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रसाद जाधव मोबा ९४०३२८९००५ अथवा श्री  रोहित महाडीक  भाजप कार्यालय कासार्डे ७०६६९३१०५३ येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रमोद जठार  मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today