सिंधुदुर्ग today
आमदार नितेश राणे याचे मतदारसंघातील काम अतिशय चांगले,शिक्षण मंत्री केसरकर यांचेकडून कौतुक
विजयदुर्ग किल्ल्याजवळ आमदार नितेश राणे आणत आहेत अतिशय सुंदर प्रकल्प
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली माहिती
ऋषिकेश मोरजकर |कणकवली
छत्रपती शिवाजी महाराजांचं नेवल हेडकॉटर म्हणजे नाविक दलाची राजधानी ही विजयदुर्ग होती. त्या विजयदुर्ग किल्ल्याजवळ लवकरात लवकर अतिशय सुंदर प्रकल्प होणार आहे. त्याच सर्व श्रेय कणकवली - देवगड - वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांना जातं. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होणार आहे. तसेच नवदल प्रमुख कान्होजी आंग्रे यांचे स्मारक होणार आहे पर्यटकांसाठी ज्या सुविधा पाहिजेत त्या विजयदुर्ग किल्ल्यावर त्या ठिकाणी निर्माण होत आहेत.अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांनी दिली.
ते म्हणाले,आमदार नितेश राणे आपल्या मतदारसंघात अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्यांचं काम हे कौतुकास्पद असल्याचे उद्गार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काढले. कणकवली येथे आयोजित एका कार्यक्रमावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
पुढे म्हणाले, मच्छीमारांसाठी अतिशय चांगलं काम सुरू आहे. पर्यटनासाठी चांगलं काम सुरू आहे. प्रामुख्याने नापणे आणि सावडाव धबधब पर्यटकांचे लक्ष वाढत आहेत. त्याही धबधब्यांच्या विकासाचं काम सुरू आहे. देशी गाईंवर संशोधनाचे काम सुरू आहे. फोंडा येथे भाताच्या रिसर्च चे काम आणि भात शेतीच उत्पादन व उत्पन्न कसं वाढवायचं याचं काम आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वैभववाडी कणकवली ला दोन्ही ठिकाणी केंद्र उभारलेली आहेत. असे म्हणत आमदार नितेश राणे यांच्या कामाचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कौतुक केलं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा