सिंधुदुर्ग today
नांदगाव येथील व्यापारी वामन म्हसकर यांच्या दुकानावर भले मोठे वृक्ष पडून ७० हजारांचे नुकसान.
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव वाघाची वाडी येथे आज झालेल्या मुसळधार पावसाने नांदगाव वाघाची वाडी येथील व्यापारी वामन धोंडू म्हसकर यांच्या असलेल्या दुकान घरावर भले मोठे वृक्ष कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ही घटना आज सायंकाळी ६.४५ च्या सुमारास घडली आहे.
सदर घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच भाजपा माजी तालुकाध्यक्ष संतोष कानडे, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर,नांदगाव सरपंच भाई मोरजकर, व्यापारी संघटना अध्यक्ष पप्पी सापळे, , विठोबा कांदळकर राजु खोत, माजी सरपंच पंढरी पारकर,संजय पाटील, मंगेश परब , तलाठी सुदर्शन अलकुटे आदींनी भेट देत माहिती घेतली. या नुकसानीची पंचनामा तलाठी अलकुटे यांनी केला आहे. एकूण 70,000 हजार रुपये नुकसान झाले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा