सिंधुदुर्ग today



मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचा काव्य पुरस्कार वितरण सोहळा तोंडवली येथे २२ रोजी

कवी अजय कांडर, कवी मधुकर मातोंडकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांची माहिती

कणकवली /प्रतिनिधी

      नांदगाव किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे या वर्षीपासून कविवर्य नारायण सुर्वे आणि कविवर्य वसंत सावंत काव्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.यावर्षीच्या सदर काव्य पुरस्काराचा वितरण सोहळा नामवंत कवी तथा प्रसिद्ध स्तंभ लेखक अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली गुरवारी २२ ऑगस्ट रोजी स. १०वा.सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी शिक्षण संकुल तोंडवली - बोभाटेवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी दिली.

   यावेळी सातारा येथील कवयित्री मनीषा शिरटावले यांनाकविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार तर वर्धा येथील कवी आशिष वरघणे यांना कविवर्य वसंत सावंत काव्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंत यशवंत सावंत,नांदगाव सरपंच भाई मोरजकर, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव आणि पत्रकार तथा असलदे विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. नांदगाव किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दरवर्षी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यापार्श्वभूमीवर मराठी साहित्यातील नव्या गुणवंत लेखक कवींना प्रोत्साहन मिळावे म्हणून कविवर्य नारायण सुर्वे आणि कविवर्य वसंत सावंत काव्य पुरस्कार योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील गुणवत्ता असून दुर्लक्षित राहिलेल्या कवी लेखकांना हे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री मोरजकर यांनी केले असून अधिक माहितीसाठी संपर्क - 90965 64410

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today