सिंधुदुर्ग today
असलदे शिवाजीनगर येथील भाजी विक्रेती लक्ष्मी रेवडेकर यांचे निधन
कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील असले शिवाजीनगर येथील भाजी विक्रेती व्यापारी लक्ष्मी यशवंत रेवडेकर वय 67 यांचे नुकतेच निधन झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून त्या आजारी होत्या.
लक्ष्मी रेवडेकर यांनी नांदगाव येथे कित्येक वर्षापासून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह केला होता. कित्येक वर्षापासून त्यांना भाजी व्यवसायीक म्हणून ओळख निर्माण झाली होती. एका हाताने अपंग असल्या तरी त्यांची व्यवसाय मध्ये चिकाटी होती. त्यांच्या पतीचेही अकाली निधन कमी वयात झाले होते . तसेच त्यांच्या एकूलता एक मुलाचेही अपघाती निधन झाले होते. नांदगाव येथील स्टॉल गेल्यावरही त्यांनी आपला भाजी व्यवसाय असलदे शिवाजीनगर येथील घराशेजारीच सुरू केला होता. त्यांच्या व्यवसायात त्यांचा भाऊ यांनी त्यांना साथ दिली होती. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी नातू ,भाऊ ,तिनं बहिणी असा परिवार आहे .तिच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा