सिंधुदुर्ग today



उप मुख्यमंत्री फडणवीस यांचे नाव पुसण्यासाठी उद्धव ठाकरेना शंभर जन्म घ्यावे लागतील

भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांची घनाघाती टीका

आमची कार्यकर्त्यांची भिंत आधी ओलांडा  मग फडणवीस यांचेवर बोलण्याची हिम्मत करा 

मुलांना वेळेत सुधारले असते तर धमकी आणि टपोरी भाषा करण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली नसती.

राजपूत चा खून झाला त्याच सीसी फुटेज महाविकास आघाडीच्या एका मोठ्या नेत्याकडे 

कणकवली प्रतिनिधी 

भाजप नेते,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची एक भिंत उभी आहे. उद्धव ठाकरे यांच्यात खरंच हिम्मत असेल तर प्रथम आमची ही भिंत ओलांडून पुढे जावून दाखवावे. त्यानंतरच फडणवीस साहेबांवर बोलावे. "मी राहीन की तू राहीन.." असे इशारे देण्यापेक्षा पोलिसांच्या गराड्यातून बाहेर या. महाराष्ट्राच्या राजकारणातून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुसण्यासाठी उद्धव ठाकरे तुम्हाला शंभर जन्म घ्यावे लागतील असा इशारा भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिला.ते कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले,

एका महिलेच्या हत्येतील आणि सामूहिक बलात्कारातील आरोपी असलेल्या मुलाचा बाप स्वतःच्या कारट्या मुलाचा राग आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कार्यकर्त्यांच्या बैठकीत काल काढत होता. स्वतःच्या मुलांना वेळेत संस्कार दिले असते, त्यांच्या सवयी सुधारल्या असत्या  तर अशा धमकी आणि टपोरी भाषा करण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली नसती. स्वतःची मुलं साडेसात नंतर नानाविध थेरे करतात. ड्रग्स पार्टी आणि नाईट लाईफ मध्ये मशगुल असतात.हे झाल्यानंतर महिलांवर गैरप्रकार करतात आणि ते लपवण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव टाकतात.त्यातही तो पकडला गेल्यावर  उध्दव ठाकरे अशी धमकी देतात. उद्धव ठाकरे यांनी उभ्या आयुष्यात मच्छर मारलेली नाही.यांना स्वतःला दोन पायावर उभे राहता येत नाही.त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना धमक्या देऊ नये. असा इशाराही यावेळी दिला.

  ठाकरे यांची अनेक प्रकरणे आहेत.ज्या दिवशी सत्य बाहेर येईल तेव्हा तू आणि तुझ्या मुलाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही.सुशांत राजपूत चा खून झाला त्याच सीसी फुटेज महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्याने ठाकरे कुटुंबला ब्लॅक मेल करण्यासाठी स्वतःकडे ठेवलेले आहे.याची माहिती घे.अनिल देशमुख दिशा सालियन चा विषय आजच का काढतात हे जेव्हा समजेल तेव्हा.फडणवीस  साहेब यांचे उपकार आठवतील.बाळासाहेबांबद्दल आदर आहे म्हणून तुम्ही दोघे पिता पुत्र जेल च्या बाहेर आहात.असा इशाराही दिला.

झाकणझूल्या संजय राऊत घाबरट,भित्रा,बाथरूम मध्ये लपणारा  राऊत आहे.त्याने आव्हानाची भाषा करू नये.तू ये मैदानात तुझ्या सारख्या चिंगम ला मी रोज खाऊन थुकतो.अशी टीका केली.

संघाची भूमिका देशाला मोठं करत आहे.अन्यथा देशातील हिंदू काँग्रेस ने संपूण टाकला असता.संजय राऊत या आंधळ्याला काँग्रेस च्या काळात आपल्या देशाची कॉमनवेल्थ वेळी बदनामी झाली त्याबाबत काँग्रेस वाल्याना विचार. तुम्ही अगोदर 40 फूट खाली आहात.तुम्हाला आम्ही पाहत नाही.

राऊत ने संरक्षण बाजूला कराव आणि बोलाव फडणवीस आज नसते तर जेल च्या बाहेर नसतास हयात हॉटेल मध्ये त्यांचे पाय धरले होतेस.हे आठव असे सुनावले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today