सिंधुदुर्ग today



अखेर नांदगाव तिठा व ओटवफाटा ब्रिज खालून सर्व लोकल एसटी यायला सुरुवात.

नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांच्या सहीत शिष्टमंडळाला मिळाले यश 

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा मार्गावरील नांदगाव तिठा व ओटवफाटा ब्रिज खालून अखेर सर्व लोकल एसटी यायला सुरुवात  झाली असून नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांच्या सहीत शिष्टमंडळाने विभाग वाहतूक नियंत्रक अभिजित पाटील यांची भेट घेत चर्चा केली होती.यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी पासूनच ब्रिज खालून यायला सुरुवात झाली असल्याने समाधान व्यक्त केले आहे.

       याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव ओटवफाटा ब्रिज खाली असलेल्या मध्यवर्ती प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास 25 गावातील रुग्ण येत असतात अशा वेळी रुग्णांना  

मुंबई गोवा हायवेचे चौपदरीकरण झाल्यानंतर नांदगाव तिठा व ओटव फाटा येथे उड्डाण पुल बांधण्यात आल्यामुळे ब-याच एसटी महामंडळाच्या बसेस प्रवासी असताना सुध्दा उड्डाण पुलावरुन जातात . त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. नांदगाव ओटव फाटा येथे 25 गावांचे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने अनेक वयोवृध्द रुग्ण या बस ने येत असतात त्यांना विनाकारण पायपीट करावी लागते. या विषयाबाबत अनेकदा निवेदन देवूनही कोणतीही कारवाई न झाल्याची बाब नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी विभाग वाहतूक नियंत्रक अभिजित पाटील यांच्या लक्षात आणून दिली. त्यावर संतप्त झालेल्या विभाग वाहतूक नियंत्रक अभिजित पाटील यांनी  जिल्हा पेटला तरी चालेल कुणाची गैय करणार नाही. नांदगाव तिठा , ओटव फाटा येथे एसटी बसेसना न थांबवल्यास पहिल्यांदा वाहतूक नियंत्रकांचे आणि नंतर चालक , वाहकांचे निलंबन करणार असल्याचे सांगितले होते .यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी सकाळ पासूनच ब्रिज खालून एसटी यायला सुरुवात झाली आहे.यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

          कणकवली येथे नांदगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एसटी बस प्रवाशांच्या समस्यांबाबत एसटी महामंडळाचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्या भेटी वेळी  नांदगाव सरपंच भाई मोरजकर , असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके , उद्योजक सुभाष बिडये , पत्रकार ऋषिकेश मोरजकर सामाजिक कार्यकर्ते कमलेश पाटील , कृष्णा वायंगणकर , तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू तांबे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today