सिंधुदुर्ग today



असलदे गावाला स्वतंत्र तलाठी मिळाल्याने शेतकरी व नागरिकांना सोयीचे होईल – भगवान लोके 

असलदे ग्रामस्थांच्यावतीने नुतन तलाठी माधुरी काबरे यांचा सत्कार ; असलदे ग्रामपंचायत मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात 

कणकवली दि. १५ ऑगस्ट - प्रतिनिधी 

असलदे गावात स्वतंत्र निर्माण झालेल्या सजेवर तलाठी मिळावी या मागणीसाठी सातत्याने प्रांताधिकारी , तहसिलदार यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. गेल्या १५ दिवसांपूर्वी गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी प्रांताधिका-यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता. प्रशासनाने त्याची दखल घेवून असलदे सजेसाठी नुतन तलाठी माधुरी काबरे यांना नियुक्ती दिली आहे. आपल्या गावात स्वातंत्र्य दिनादिवशी तलाठी हजर होत आहेत हा चांगला योगायोग आहे. तलाठी माधुरी काबरे या पुढील काळात गावात सेवा देणार असल्यामुळे  शेतकरी , नागरीकांना सोयीचे होणार असल्याचे मत असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी व्यक्त केला. 

असलदे ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन , लहान मुलांचे गीत गायन कार्यक्रम पार पडला तसेच असलदे ग्रामस्थांच्यावतीने नुतन तलाठी माधुरी काबरे यांचा सत्कार सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी चेअरमन भगवान लोके यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून करण्यात आला.  यावेळी उपसरपंच सचिन परब , व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , माजी सरपंच पंढरी वायंगणकर , माजी चेअरमन प्रकाश परब, महेश लोके , रघुनाथ लोके , देवेंद्र लोके ,प्रदीप हरमलकर, संतोष परब, वासुदेव दळवी , सोसायटी संचालक उदय परब , माजी तंटामुक्त अध्यक्ष बाबाजी शिंदे , ग्रा.पं. सदस्य स्वप्ना डामरे , विद्या आचरेकर , तुषार घाडी , प्रविण डगरे, प्रविण डामरे , दिनेश शिंदे , ग्रामसेवक संजय तांबे , मुख्याध्यापिका विनिता सावंत, शिक्षिका अर्चना लोके , अंगणवाडी सेविका कोमल परब , आशा सेविका , भाग्यश्री नरे , साक्षी हडकर , संजना हडकर , पोलीस पाटील सावित्री पाताडे , कर्मचारी मधुसुदन परब , सायली दळवी , गौरी लोके , प्रतिक्षा परब , सत्यवान घाडी , प्रकाश वाळके , आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.   

यावेळी नुतन तलाठी माधुरी काबरे म्हणाल्या असलदे गावातील नागरिकांना माझ्या तलाठी निवडीबद्दल जो सन्मान केला . त्याबद्दल मी ऋणी आहे. या गावात तलाठी म्हणून काम करण्यापूर्वी पुढील एक ते दीड महिना प्रशिक्षण कालावधी आहे. तरी देखील जे अधिकार तहसिलकार्यालयातून मला प्राप्त होतील . त्यानुसार नागरिकांना सेवा मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. लवकरच वरीष्ठांच्या आदेशानुसार असलदे सजा येथे माझे कामकाज सुरु करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

दरम्यान , असलदे गावात नुतन तलाठी आल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today