पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  नांदगाव ग्रामविकास अधिकारी पुरुषोत्तम हरमळकर याना विस्तार अधिकारीपदी बढती. नांदगाव: ऋषिकेश मोरजकर कणकवली : नांदगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पदी कार्यरत असलेले पुरुषोत्तम हरमळकर यांना विस्तार अधिकारी पदी बढती मिळाली असून जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी हरमळकर यांना बढती आदेश देत त्यांचे अभिनंदन केले. हरमळकर हे सध्या  नांदगाव ग्रामपंचायत येथे ग्रामविकास अधिकारी पदी कार्यरत होते. विस्तार अधिकारी पदी बढती मिळाल्याबद्दल  कणकवली पं स चे गटविकवस अधिकारी अरुण चव्हाण यांनी  हरमळकर यांचे  पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.यावेळी विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  आमदार नितेश राणे यांनी बकरी ईद निमित्ताने नांदगाव येथे येत  रज्जाक बटवाले यांना दिल्या शुभेच्छा. नांदगाव/प्रतिनिधी आमदार  नितेश राणे यांनी आज बकरी ईद निमित्ताने नांदगाव येथे रज्जाक बटवाले यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या आहेत.   यावेळी रज्जाक बटवाले यांनी आमदार नितेश राणेंचे शाल पुष्पगुच्छ व कल्पवृक्ष देऊन स्वागत केले आहे.   यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर ,माजी उपसरपंच निरज मोरये ,यासिर मास्के, मौलाना आदि मान्यवर उपस्थित होते.      तसेच बकरी ईदनिमित्त नांदगांव गावातील मुस्लिम बांधवांना  भा ज पा तालुका पदाधिकारी यांनी ही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत.

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  बकरी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना भाजपा पदाधिकारी यांनी दिल्या शुभेच्छा. नांदगाव/प्रतिनिधी आज बकरी ईदनिमित्त नांदगांव गावातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा भा ज पा तालुका पदाधिकारी यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत. नांदगाव येथे हिंदू मुस्लिम बांधव एकीने राहतात त्याचेच प्रतीक म्हणून आज सर्व हिंदू बांधवांनी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. आज बकरी ईदनिमित्त नांदगांव गावातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी भा ज पा तालुका प्रमुख मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, सरपंच रविराज मोरजकर ,उप सरपंच इरफान साटविलकर ,सोशल मीडिया प्रमुख समीर प्रभूगावकर, युवक तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर, पप्पू पुजारे ,नितीन पडावे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, सर्वेश दळवी, संतोष बोभाटे, माजी सरपंच आफ्रोजा नावळेकर, ग्राम प सदस्य रमिजान बटवाले ,जैबा नावळेकर रज्जाक बटवाले  आदी मुस्लिम बांधवांच्या घरी भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  नांदगाव ओटवफाटा ब्रिज खाली कंटेनर ला अपघात . हायवेवर दिशा दर्शक फलक नसल्याने कोल्हापूर ला जाणारा कंटेनर ओटव फाटा ब्रिज खाली उतरला आणि अपघात झाला नांदगाव ऋषिकेश मोरजकर मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव फाटा ब्रिज खाली आज मध्यरात्री एकच्या सुमारास कंटेनरला अपघात झाला यामुळे नांदगाव फोटो फाटा  ते नांदगाव तिठा आधीच एका सर्विस रस्त्याने एकेरी वाहतूक सुरू आहे आणि या अपघातामुळे  वाहनांना अडथळा निर्माण झालेला आहे.      हा अपघात गोवा ते कोल्हापूर  दिशेने जात असताना हायवेच्या चुकीमुळे म्हणजेच ठिकठिकाणी दिशादर्शक फलक न लावल्याने कोल्हापूरला जाण्याऐवजी या कंटेनर चालकांनी नांदगाव ओटव फाटा ब्रिज खाली वाहन वळवीत असताना हा अपघात झाला सदर अपघातामध्ये पुढील चाक पूर्णता सिमेंट काँक्रेट ने बांधलेल्या गटारामध्ये उतरल्याने अपघात झालेला आहे.        नांदगाव तिठा  कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला सर्विस रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला मात्र नांदगाव फाटा जवळील सर्विस रस्ता होऊनही काही संरक्षण कठडा बांधत असल्याने या ठिकाणी रस्त्यावरच रेती आणि खडी टाकण्यात...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  सेंद्रिय शेती मार्गदर्शन नांदगाव ग्रामपंचायत चा उपक्रम नांदगाव | प्रतिनिधी आज  दि 24 जून 2023 रोजी ग्राम पंचायत नांदगाव येथे सेंद्रिय शेती बाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे . नांदगाव ग्रामपंचायत च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मार्गदर्शक म्हणून श्री पाटील यांनी शेतकऱ्यांचे गट स्थापन करण्याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर सरकार कडून मिळणारे फायदे व शासकीय योजना याबाबत माहिती दिली.त्यानंतर डॉ.श्री बांदकर यांनी गोपालन बाबत माहिती दिली. दूध गोमूत्र शेण यापासून आपल्याला कसे उत्पन्न घेता येईल याबाबत माहिती दिली आहे.     यावेळी सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर,उपसरपंच इरफान साटविलकर, पाटील,बांदकर, कृषी सहायक बुधवळे , ज्योती देसाई, गणेश खोत, राजू तांबे, विठोबा कांदळकर आदी शेतकरी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  तिवरे प्राथमिक शाळेच्या साहित्यिक वाटचालीचा पुण्यात गौरव बालकुमार साहित्य संस्थेचा काव्य पुरस्कार तिवरे शाळेला प्रदान कणकवली/ऋषिकेश मोरजकर      कणकवली तालुक्यातील तिवरे प्राथमिक शाळा १च्या विद्यार्थ्यांच्या प्रभा प्रकाशनतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या "विद्यार्थ्यांच्या कविता" या काव्यसंग्रहाला पुणे येथील अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार  साहित्य संस्थेच्या प्रतिष्ठित अशा २०२३ सालच्या बाल काव्यपुरस्काराने  पुणे येथे गौरविण्यात आले.        टिळक महाराष्ट्र पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आणि महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती पुणेचे संचालक ज.गं.फगरे,ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आणि साहित्यिक डॉ.न.म.जोशी,विश्वर्मा पब्लिकेशनचे सी.ई .ओ.विशाल सोनी,ज्येष्ठ कवी राजन लाखे,कविता मेहंदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सदर पुरस्काराने तिवरे शाळेला सन्मानित करण्यात आले.सदर सन्मान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास आंबेलकर, मुख्याध्यापिका दिप्ती जाधव,सहशिक्षक विजय मेस्त्री, पालक दाजी चव्हाण विद्यार...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आयुष्यमान भारत हेल्थ अकॉउंट (ABHA )आयडी कार्ड काढून घ्यावे:डॉ तपसे   नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)  आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ही केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना आहे . या योजने अंतर्गत सर्व व्यक्तींनी आभा ID काढून घ्यावे जेणेकरून दवाखान्यात जाताना कुठल्याही कागदपत्राची आवश्यकता भासणार नाही. हे कार्ड काढण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे मोफत सुविधा आहे त्यासाठी फक्त आधार कार्ड झेरॉक्स ची गरज आहे . आभा कार्ड काढल्यास 14 अंकी नंबर तयार होतो . तो नंबर ऑनलाईन टाकल्यास आरोग्याची सर्व माहिती डॉक्टरांना कळते या आभा आयडी कार्डचा सर्वांनी फायदा घ्यावा त्यासाठी आपल्या गावातील आशा स्वयंसेविका यांची मदत घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता तपसे यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  बावशी प्राथमिक शाळा १ ला शिक्षक देण्याची ग्रामस्थांची मागणी शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन ग्रामस्थांनी दिले मागणीचे निवेदन कणकवली/ ऋषिकेश मोरजकर     विकासापासून कायमच वंचित राहिलेल्या बावशी प्राथमिक शाळा १ मधील शिक्षकाची बदली होऊनही पर्यायी शिक्षक न दिल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.या पार्श्वभूमीवर बावशी ग्रामस्थांनी तालुका शिक्षण विभागाला भेट देऊन शाळेत तातडीने नवीन शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी केली. यावेळी त्यांनी आपल्या मागणीचे निवेदनही शिक्षण अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिले.      चार वर्ग असलेल्या बावशी प्राथमिक शाळे १ मध्ये सध्या सोळा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.मात्र त्यातील एका शिक्षकाची जिल्ह्या बाहेर बदली झाल्याने एक जागा रिक्तच राहिली. त्याजागी अद्यापही नव्या शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे गावचे ग्रामस्थ तथा पोलीस पाटील समीर मयेकर, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा संजय राणे, सुरेश कदम, रुपेश कांडर, संदेश कांडर आदींसह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  उन्हाळी सुट्टी नंतर आज पुन्हा शाळा बहरल्या  सिंधुदुर्ग -  (ऋषिकेश मोरजकर ) तळकोकणातली उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर आज छोट्या- छोट्या मुलांनी शाळेत प्रथम दिवशी शंभर टक्के उपस्थित लावली आहे.त्यामुळे कोकणातल्या सर्व शाळा मुलांनी बहरून गेलेल्या पाहायला मिळत आहे.        जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव तिठा असलदे क्र 4 आज शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेश उत्सवा निमित्त नवागतांचे स्वागत पाठ्यपुस्तक वितरण या कार्यक्रमासाठी नांदगांव गावचे सरपंच रविराज उर्फ भाई  मोरजकर,असलदे गावचे माजी पंढरी वायंगणकर, माजी केंद्र प्रमुख संतोष जाधव, निवृत्त कृषी सहायक नामदेव परब, पत्रकार अनंत पाताडे,रुपेश खरात ,विजय खरात ,व मुख्याध्यापिका सोनाली सामंत, उपशिक्षका कुडतडकर आणि पालक उपस्थित होते.तसेच सावित्रीबाई फुले व सरस्वती पूजन करून मुलांना खाऊ वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे मुलांना मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  ' सारेच पुरुष नसतात बदनाम'ने आवाजी स्त्रीवादाला धक्काच दिला 'सारेच पुरुष नसतात बदनाम' काव्यसंग्रहावरील चर्चासत्रात समीक्षक प्राचार्य शोभा नाईक यांचे परखड प्रतिपादन नाथ पै सेवांगणतर्फे मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत चर्चासत्राचे आयोजन कणकवली/प्रतिनिधी     'सारेच पुरुष नसतात बदनाम' या १९ कवयित्रींच्या प्रातिनिधी काव्यसंग्रहाने आवाजी  स्त्रीवादाला धक्काच दिला आहे. या संग्रहावरील चर्चासत्राने सत्तर नंतर पाश्चिमात्य स्त्रीवादाच्या मागे जात मराठीत होणाऱ्या मांडणीला  छेद देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.त्यामुळे हे चर्चासत्र खूप काळ स्मरणात राहील.चर्चासत्र आयोजनामागील भूमिकेमुळे स्त्रीवादावर आजवर झालेल्या चर्चासत्रांसमोर हे चर्चसत्र निश्चितच उजवे ठरले आहे असे स्पष्ट प्रतिपादन नामवंत समीक्षक डॉ. शोभा नाईक यांनी केले.     बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण आणि समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने 'सारेच पुरुष नसतात बदनाम ' या कवयित्रींच्या प्रातिनिधिक कवितासंग्रहावरील हे चर्चासत्र डॉ.नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि नाथ पै  सेवांगणचे अध्...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  असलदे गावातील विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी परीक्षेत  मिळवलेले यश कौतुकास्पद – प्रमोद लोके     असलदे ग्रामपंचायत व रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गुणवंतांचा सत्कार सोहळा ; मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा कणकवली दि. ८ जुन - सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलदे हा गाव नेहमीच विविध क्षेत्राच अग्रस्थानी आहे. आत्ताच दहावी व बारावी परिक्षांचा निकाल जाहिर झाला त्यात आपल्या गावातील अनेक विद्यार्थ्यानी चांगले शैक्षणित यश संपादन केले आहे. असलदे गावची कु. भक्ती दयानंद हडकर हिने दहावी बोर्ड परिक्षेत ९१ टक्के मिळवत कासार्डे केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे , हा गावाचा अभिमान आहे. आत्ताचे विद्यार्थी उद्याचे गाव विकासित करणारे भविष्यातील पिढी आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी गावाच्या वतीने या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आहेत . या विद्यार्थ्यांनी पुढील जीवनात आवडीचे करीअर करण्यासाठी शैक्षणिक उन्नती साधावी. असलदे गावातील विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी परीक्षेत  मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कोळोशी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक प्रमोद लोके...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  बॅरिस्टर नाथ पै सेवांगणतर्फे १० रोजी खुले कविसंमेलन जुन्या नव्या कवींनी सहभागी होण्याचे आवाहन कणकवली/प्रतिनिधी     बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवणतर्फे शनिवार 10 जून रोजी स.१०.३० वा. सातारा-वाई येथील प्रसिद्ध कवयित्री डॉ योगिता राजकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रसिद्ध मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांच्या प्रमुख उपस्थितीत खुल्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांनी दिली.       कोकणातील कवीना प्रेरणा मिळावी या उद्देशाने नव्या जुन्या कवींच्या सहभागाने या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कविसंमेलनात सहभागी होणाऱ्या कवींना कोणत्याही विषयावर आपली कविता सादर करता येणार आहे. कविता सादर करण्याला विषयाचे बंधन नाही.बॅरिस्टर नाथ पैसे सेवांगण अलीकडल्या काही वर्षात सातत्याने विविध कार्यक्रम आयोजित करत आहे.यात सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबर साहित्यिक उपक्रमांचाही समावेश आहे. अलीकडे सेवांगणने जनवादी साहित्याचे चळवळीच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक शिबिराचे आयोजन केले होते. त्यापूर्वी गांधीजींच्या साहित्यावर ...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  नाथ पै सेवांगणतर्फे १० जून रोजी 'सारेच पुरुष नसतात बदनाम' ग्रंथावर चर्चासत्र समीक्षक प्राचार्य डॉ.शोभा नाईक यांच्यासह विविध अभ्यासकांचा सहभाग बॅ.नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांची माहिती कणकवली/प्रतिनिधी      कवी अजय कांडर, ललित लेखक वैभव साटम आणि सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांनी 'सारेच पुरुष नसतात बदनाम' या 19 कवयित्रींच्या कवितांचा समावेश असलेल्या प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचे संपादन केले. आता या संग्रहावर बॅ. नाथ पै सेवांगण मालवणतर्फे शनिवार १० जून रोजी स.१०.३० वा. सेवांगणच्या सभागृहात बेळगाव येथील ख्यातनाम समीक्षक प्राचार्य डॉ.शोभा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांनी दिली.     'सारेच पुरुष नसतात बदनाम' हा बहुचर्चित प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे.यात कोकणसह महाराष्ट्रातील एकोणीस कवयित्रींच्या प्रत्येकी चार कवितांचा समावेश आहे. या संग्रहावर आता स्वतंत्र चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून डॉ शोभा नाईक यांच्या अध्यक...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  शेठ म.वि. केसरकर  हायस्कूल  वारगाव चा निकाल 100 टक्के कणकवली प्रतिनिधी  शेठ म.वि. केसरकर  हायस्कूल  वारगाव चा निकाल परंपरेप्रमाणे 100℅ लागला आहे. सर्व 41 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्रावीण्य 15, प्रथम श्रेणीत 20 व द्वितीय श्रेणी 6 विद्यार्थी चमकले आहेत. प्रथम तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक आदित्य दशरथ जाधव 89.40℅, व्दितीय क्रमांक पृथ्वीराज दत्तात्रय नामये 86℅ तर तृतीय क्रमांक सिद्धी निलेश टक्के 85.60℅या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे.           सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष  मा. शांताराम केसरकर,सरचिटणीस मा. अनंत नर, कार्याध्यक्ष मा. विजय केसरकर, मुख्याध्यापक वाळके सर तसेच सर्व संस्था पदाधिकारी व शाळा समिती पदाधिकारी व ग्रामस्थ पालक यांनी अभिनंदन केले आहे.

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
नांदगाव सरस्वती हायस्कूल चा निकाल 98.48 % नांदगाव हाय.मध्ये भक्ती दयानंद हडकर प्रथम . ऋषिकेश मोरजकर|नांदगाव   कणकवली तालुक्यातील सरस्वती हायस्कूल नांदगाव या माध्यमिक विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल 98.48% लागला असून या विद्यालयात एकूण 66 विद्यार्थी परीक्षेत बसले होते यातील 65 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.          या विद्यालयातून कुमारी भक्ती दयानंद हडकर हिला 91 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मान मिळविला आहे.तर व्दितीय क्रमांक आशपाक आसिफ साटविलकर 89.20 टक्के तर तृतीय क्रमांक धनंजय पांडुरंग म्हसकर 88.80 टक्के गुण मिळविले आहे.       या सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे संस्थेचे चेअरमन नागेश मोरये व मुख्याध्यापक श्री सुधीर तांबे यांनी अभिनंदन केले आहे.