सिंधुदुर्ग Today न्यूज
उन्हाळी सुट्टी नंतर आज पुन्हा शाळा बहरल्या
सिंधुदुर्ग - (ऋषिकेश मोरजकर )
तळकोकणातली उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर आज छोट्या- छोट्या मुलांनी शाळेत प्रथम दिवशी शंभर टक्के उपस्थित लावली आहे.त्यामुळे कोकणातल्या सर्व शाळा मुलांनी बहरून गेलेल्या पाहायला मिळत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव तिठा असलदे क्र 4 आज शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेश उत्सवा निमित्त नवागतांचे स्वागत पाठ्यपुस्तक वितरण या कार्यक्रमासाठी नांदगांव गावचे सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर,असलदे गावचे माजी पंढरी वायंगणकर, माजी केंद्र प्रमुख संतोष जाधव, निवृत्त कृषी सहायक नामदेव परब, पत्रकार अनंत पाताडे,रुपेश खरात ,विजय खरात ,व मुख्याध्यापिका सोनाली सामंत, उपशिक्षका कुडतडकर आणि पालक उपस्थित होते.तसेच सावित्रीबाई फुले व सरस्वती पूजन करून मुलांना खाऊ वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे मुलांना मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा