सिंधुदुर्ग Today न्यूज

 


नांदगाव ओटवफाटा ब्रिज खाली कंटेनर ला अपघात.


हायवेवर दिशा दर्शक फलक नसल्याने कोल्हापूर ला जाणारा कंटेनर ओटव फाटा ब्रिज खाली उतरला आणि अपघात झाला

नांदगाव ऋषिकेश मोरजकर

मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव फाटा ब्रिज खाली आज मध्यरात्री एकच्या सुमारास कंटेनरला अपघात झाला यामुळे नांदगाव फोटो फाटा  ते नांदगाव तिठा आधीच एका सर्विस रस्त्याने एकेरी वाहतूक सुरू आहे आणि या अपघातामुळे  वाहनांना अडथळा निर्माण झालेला आहे.

     हा अपघात गोवा ते कोल्हापूर  दिशेने जात असताना हायवेच्या चुकीमुळे म्हणजेच ठिकठिकाणी दिशादर्शक फलक न लावल्याने कोल्हापूरला जाण्याऐवजी या कंटेनर चालकांनी नांदगाव ओटव फाटा ब्रिज खाली वाहन वळवीत असताना हा अपघात झाला सदर अपघातामध्ये पुढील चाक पूर्णता सिमेंट काँक्रेट ने बांधलेल्या गटारामध्ये उतरल्याने अपघात झालेला आहे.

       नांदगाव तिठा  कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला सर्विस रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला मात्र नांदगाव फाटा जवळील सर्विस रस्ता होऊनही काही संरक्षण कठडा बांधत असल्याने या ठिकाणी रस्त्यावरच रेती आणि खडी टाकण्यात आलेली आहे त्यामुळे तेथील मार्ग पूर्णतः बंद आहे या कारणाने नांदगाव,ओटव , माईण,सावडाव  पासून किंवा आरोग्य केंद्र येथे येणाऱ्या सर्व वाहनधारकांना नांदगाव तिठा येथे जाण्यासाठी विरुद्ध दिशेने वाहतूक करावी लागत आहे .



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today