सिंधुदुर्ग Today न्यूज

 


आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आयुष्यमान भारत हेल्थ अकॉउंट (ABHA )आयडी कार्ड काढून घ्यावे:डॉ तपसे 

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

 आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ही केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना आहे . या योजने अंतर्गत सर्व व्यक्तींनी आभा ID काढून घ्यावे जेणेकरून दवाखान्यात जाताना कुठल्याही कागदपत्राची आवश्यकता भासणार नाही. हे कार्ड काढण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे मोफत सुविधा आहे त्यासाठी फक्त आधार कार्ड झेरॉक्स ची गरज आहे . आभा कार्ड काढल्यास 14 अंकी नंबर तयार होतो . तो नंबर ऑनलाईन टाकल्यास आरोग्याची सर्व माहिती डॉक्टरांना कळते या आभा आयडी कार्डचा सर्वांनी फायदा घ्यावा त्यासाठी आपल्या गावातील आशा स्वयंसेविका यांची मदत घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता तपसे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today