सिंधुदुर्ग Today न्यूज

 


बॅरिस्टर नाथ पै सेवांगणतर्फे १० रोजी खुले कविसंमेलन

जुन्या नव्या कवींनी सहभागी होण्याचे आवाहन

कणकवली/प्रतिनिधी

    बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवणतर्फे शनिवार 10 जून रोजी स.१०.३० वा. सातारा-वाई येथील प्रसिद्ध कवयित्री डॉ योगिता राजकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रसिद्ध मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांच्या प्रमुख उपस्थितीत खुल्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांनी दिली.

      कोकणातील कवीना प्रेरणा मिळावी या उद्देशाने नव्या जुन्या कवींच्या सहभागाने या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कविसंमेलनात सहभागी होणाऱ्या कवींना कोणत्याही विषयावर आपली कविता सादर करता येणार आहे. कविता सादर करण्याला विषयाचे बंधन नाही.बॅरिस्टर नाथ पैसे सेवांगण अलीकडल्या काही वर्षात सातत्याने विविध कार्यक्रम आयोजित करत आहे.यात सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबर साहित्यिक उपक्रमांचाही समावेश आहे. अलीकडे सेवांगणने जनवादी साहित्याचे चळवळीच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक शिबिराचे आयोजन केले होते. त्यापूर्वी गांधीजींच्या साहित्यावर चर्चासत्राचेही आयोजन केले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात मान्यवर कवी सहभागी होणार आहेतच परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्या जुन्या सर्व कवींनी आपल्या कविता सादर करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन सेवांगणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले आहे.

   खुल्या कविसंमेलनात सहभागी होणाऱ्या कवीने आपल्या नाव नोंदणीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा-  94049 06570

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today