सिंधुदुर्ग Today न्यूज

 


बावशी प्राथमिक शाळा १ ला शिक्षक देण्याची ग्रामस्थांची मागणी

शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन ग्रामस्थांनी दिले मागणीचे निवेदन

कणकवली/ ऋषिकेश मोरजकर 

   विकासापासून कायमच वंचित राहिलेल्या बावशी प्राथमिक शाळा १ मधील शिक्षकाची बदली होऊनही पर्यायी शिक्षक न दिल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.या पार्श्वभूमीवर बावशी ग्रामस्थांनी तालुका शिक्षण विभागाला भेट देऊन शाळेत तातडीने नवीन शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी केली. यावेळी त्यांनी आपल्या मागणीचे निवेदनही शिक्षण अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिले.

     चार वर्ग असलेल्या बावशी प्राथमिक शाळे १ मध्ये सध्या सोळा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.मात्र त्यातील एका शिक्षकाची जिल्ह्या बाहेर बदली झाल्याने एक जागा रिक्तच राहिली. त्याजागी अद्यापही नव्या शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे गावचे ग्रामस्थ तथा पोलीस पाटील समीर मयेकर, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा संजय राणे, सुरेश कदम, रुपेश कांडर, संदेश कांडर आदींसह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी तालुका शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी या कार्यकर्त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन कार्यालयातील शिक्षण कनिष्ठ सहाय्यक आनंद जाधव यांना दिले. व कामानिमित्त दौऱ्यावर गेलेल्या गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांच्याशी फोनवर या संदर्भात चर्चा केली.

     गटशिक्षणाधिकारी गवस यांच्याशी बोलताना बावशी ग्रामस्थ म्हणाले की बावशी गावातील विद्यार्थी शिक्षक नसल्याने प्रगतशील शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. शाळेतील एका शिक्षकाची बाहेरील जिल्ह्यात बदली झाल्याने चार वर्गाची ही शाळा सध्या एक शिक्षकी बनली आहे.हा शिक्षक प्रामाणिकपणे काम करणारा असला तरी एका शिक्षकावर चार वर्ग सोपविणे म्हणजे मुलांचे शैक्षणिक नुकसान करणे होय!तरी या सर्व पार्श्वभूमीवर नवीन शिक्षक त्वरित देण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today