सिंधुदुर्ग Today न्यूज
नांदगाव ग्रामविकास अधिकारी पुरुषोत्तम हरमळकर याना विस्तार अधिकारीपदी बढती.
नांदगाव: ऋषिकेश मोरजकर
कणकवली : नांदगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पदी कार्यरत असलेले पुरुषोत्तम हरमळकर यांना विस्तार अधिकारी पदी बढती मिळाली असून जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी हरमळकर यांना बढती आदेश देत त्यांचे अभिनंदन केले. हरमळकर हे सध्या नांदगाव ग्रामपंचायत येथे ग्रामविकास अधिकारी पदी कार्यरत होते. विस्तार अधिकारी पदी बढती मिळाल्याबद्दल कणकवली पं स चे गटविकवस अधिकारी अरुण चव्हाण यांनी हरमळकर यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.यावेळी विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा