सिंधुदुर्ग Today न्यूज

 


तिवरे प्राथमिक शाळेच्या साहित्यिक वाटचालीचा पुण्यात गौरव

बालकुमार साहित्य संस्थेचा काव्य पुरस्कार तिवरे शाळेला प्रदान

कणकवली/ऋषिकेश मोरजकर 

    कणकवली तालुक्यातील तिवरे प्राथमिक शाळा १च्या विद्यार्थ्यांच्या प्रभा प्रकाशनतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या "विद्यार्थ्यांच्या कविता" या काव्यसंग्रहाला पुणे येथील अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार  साहित्य संस्थेच्या प्रतिष्ठित अशा २०२३ सालच्या बाल काव्यपुरस्काराने  पुणे येथे गौरविण्यात आले.

       टिळक महाराष्ट्र पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आणि महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती पुणेचे संचालक ज.गं.फगरे,ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आणि साहित्यिक डॉ.न.म.जोशी,विश्वर्मा पब्लिकेशनचे सी.ई .ओ.विशाल सोनी,ज्येष्ठ कवी राजन लाखे,कविता मेहंदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सदर पुरस्काराने तिवरे शाळेला सन्मानित करण्यात आले.सदर सन्मान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास आंबेलकर, मुख्याध्यापिका दिप्ती जाधव,सहशिक्षक विजय मेस्त्री, पालक दाजी चव्हाण विद्यार्थी समीक्षा चव्हाण,रिया परब ,समीक्षा गोसावी,वैष्णवी सुतार,प्रियांका चव्हाण आणि काव्यसंग्रहाचे मार्गदर्शक शिक्षक संदीप कदम यांनी स्वीकारला. तिवरे शाळेच्या या यशाबद्दल कणकवली गट शिक्षणाधिकारी किशोर गवस, केंद्र प्रमुख शांताराम सावंत,जुहिली सावंत,  माजी मुख्याध्यापक विजय शिरसाट ,हेमंत राणे,करुणा     आंबेलकर यांनी अभिनंदन केले आहे.

       सदर शाळेचे माजी शिक्षक संदीप कदम यांच्या संकल्पनेतून आणि माजी मुख्याध्यापक विजय शिरसाठ तसेच शाळा व्यवस्थापन समिती रामदास आंबेलकर यांच्या प्रोत्साहनातून तिवरे शाळेतील विद्यार्थ्यांच्या कवितांचा संग्रह प्रकाशित करण्यात आला. या संग्रहाच्या प्रकाशन समारंभाला प्रांताधिकार्‍यांसह, जिल्हा उपशिक्षणाधिकारी तसेच विविध प्रशासकीय अधिकारी आणि प्रतिष्ठित साहित्यिक उपस्थित होते. प्रभा प्रकाशनातर्फे विद्यार्थ्यांच्या कवितेचा हा संग्रह महाराष्ट्राच्या मुंबई, पुणे,नांदेड अशा दूरच्या भागातील मान्यवर साहित्यिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. या संग्रहाला अल्प कालावधीत मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या बालसाहित्यिका डॉ.संगीता बर्वे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या संग्रहाला लाभली. आणि आता या संग्रहाला प्रतिष्ठित असा अमरेंद्र भास्कर बाल काव्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सिंधुदुर्गच्या साहित्य चळवळीतून तिवरे शाळेतील विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today