सिंधुदुर्ग Today न्यूज
सेंद्रिय शेती मार्गदर्शन
नांदगाव ग्रामपंचायत चा उपक्रम
नांदगाव | प्रतिनिधी
आज दि 24 जून 2023 रोजी ग्राम पंचायत नांदगाव येथे सेंद्रिय शेती बाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे . नांदगाव ग्रामपंचायत च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मार्गदर्शक म्हणून श्री पाटील यांनी शेतकऱ्यांचे गट स्थापन करण्याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर सरकार कडून मिळणारे फायदे व शासकीय योजना याबाबत माहिती दिली.त्यानंतर डॉ.श्री बांदकर यांनी गोपालन बाबत माहिती दिली.
दूध गोमूत्र शेण यापासून आपल्याला कसे उत्पन्न घेता येईल याबाबत माहिती दिली आहे.
यावेळी सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर,उपसरपंच इरफान साटविलकर, पाटील,बांदकर, कृषी सहायक बुधवळे , ज्योती देसाई, गणेश खोत, राजू तांबे, विठोबा कांदळकर आदी शेतकरी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा