सिंधुदुर्ग today
नांदगाव विभागातील नवीन उबाठा सेना पदाधिकारी यांचा केला सत्कार. नांदगाव /प्रतिनिधी सचिन लोके यांची कणकवली उपतालुकाप्रमुख तर सुरेश सुतार यांची उपविभाग प्रमुख नियुक्ती केल्याने नांदगाव उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. नांदगाव शाखेत झालेल्या या कार्यक्रमाला अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मज्जिद बटवाले, विभाग प्रमुख तात्या निकम, राजा नावलेकर ,अनिल नरे ,दिलीप डामरे ,संजय डगरे शाखाप्रमुख , लक्ष्मण लोके , सचिन हरमलकर , राधा शिव घाडीगावकर, प्रकाश पाताडे. मोबीन साठविलकर, याकूब नावलेकर , मुराद बटवाले, करीम बटवाले, मुस्ताक नावलेकर ,शेरफुद्दीन नावलेकर ,खुदबुद्दीन नावलेकर आदी उपस्थित होते.