पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
जिल्ह्याचे  व्यापारी धोरण ठरवा,पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत  मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन समस्या सोडविण्यासाठी दर तीन महिन्यांनी व्यापारी प्रशासन आणि पालकमंत्री अशी संयुक्त बैठक घेवुया  पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वैभववाडी येथे व्यापारी एकता मेळाव्याचे झाले शानदार उद्घाटन ऋषिकेश मोरजकर ( वैभववाडी) सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्ह्याचे  व्यापारी धोरण ठरवावे. पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात कोणतीच तडजोड होणार नाही. निधी भरपूर मिळणार, रोजगार उभा केला जाणार आहे. प्रकल्प येणार या सर्वच पार्शुभुमिवर  जिल्हाचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी  आम्ही सक्रिय झालो आहोत.व्यापारी म्हणून तुमची भूमिका आणि योगदान महत्वाचे आहे.सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी शासकीय आधीकरी आणि पालकमंत्री अशी संयुक्त बैठक दर तीन महिन्यांनी घेवून जिल्यातील व्यापाऱ्यांच्या प्रत्येक समस्या सोडवूया आणि जिल्ह्याच्या  व्यापार आला नवी ओळख निर्माण करून देवूया असे आवाहन मत्स्य व्यवसा...

सिंधुदुर्ग today

इमेज
  अशिक्षित माणसेच भाषा टिकवितात - कवी अजय कांडर  कणकवली न्यायालयात मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम  कणकवली/ऋषिकेश मोरजकर      आपली बोली टिकली तरच आपली प्रमाणभाषा टिकत असते. त्यामुळे बोलीला अडाण्यांची भाषा म्हणणारे लोकच अडाणी असतात. उलट ज्या अशिक्षित लोकांना आपण अडाणी म्हणतो तेच भाषा टिकवीत असतात. कारण त्यांच्या रोजच्या बोलण्याच्या बोलीतूनच प्रमाण भाषेला नवनवीन शब्द मिळत असतात. परिणामी उच्चशिक्षित वर्गापासून न शिकलेल्या वर्गापर्यंत सर्वांनीच आपल्या बोलीचा अभिमान बाळगून आपल्या बोलीत अधिकाधिक बोलत राहिले पाहिजे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी तथा स्तंभ लेखक अजय कांडर यांनी येथील न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमात बोलताना केले.      कणकवली न्यायालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्त कवी अजय कांडर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाषा संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी 'मराठी अभिजात भाषा आणि आपण' या विषयावर कवी कांडर यांनी आपले विचार मांडले. यावेळी न्यायमूर्ती श्री शेख, न्यायमूर्ती श्री सोनटक्के, ज्येष्ठ वकील ॲड. विलास परब, ॲड.दळवी...

सिंधुदुर्ग today

इमेज
  नांदगाव असलदे वाले पिर बाबांचा ३१ रोजी उर्स मुबारक. कव्वाली चा जंगी सामना  कवाल तौसिफ कादरी बेंगलोर विरुद्ध कवालन आफरीन बानू  हुबळी कर्नाटक यांच्यात रंगणार  नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील नांदगाव असलदे वाले पिर बाबांचा दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी देवगड निपाणी महामार्गा लगत असलेल्या असलदे येथील दर्गा ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.        दुपारी २ नंतर नांदगाव तिठा येथील मस्जिद मधून तसेच नांदगाव खालची मुस्लिम वाडी मस्जिद मधून वाजत गाजत संदल एकत्र येऊन नांदगांव तिठा येते २ ते ५ रातीप खेळ खेळला जातो व ५ वाजता संदल घेऊन दरग्या कडे जाण्यास निघतात व असलदे येथील दर्गा पर्यंत सायंकाळी ७ पर्यंत पोहचतात . सिंधुदुर्ग जिल्हा कानाकोपऱ्यातून व जिल्हा बाहेरून ही भाविक येतात.     या उर्स मुबारक निमित्ताने ३१ जानेवारी रोजी ७.३० ते १० पर्यंत नियाज वाटप होते तर रात्री १० वा. कव्वाली चा जंगी सामना कवाल तौसिफ कादरी बेंगलोर आणि कवालन आफरीन बानू,  हुबळी कर्नाटक यांच्यात रंगणार आहे.      तरी स...

सिंधुदुर्ग today

इमेज
  दुंडागड वरती होणार २५ मोहीम किल्ल्याचा महादरवाजा होणार मोकळा कणकवली प्रतिनिधी  मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य,{ रजि }, कणकवली विभाग यांच्या संकल्पनेतून आणि चाफेड ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने  दुंडागड / दुर्गाचा डोंगर (चाफेड. ता.देवगड,सिंधुदुर्ग ) या किल्ल्यावर मुख्य प्रवेशद्वार उत्खनन च्या 2025 मधे ऐकून 25 मोहीम होणार आहेत त्या पैकी  तीन मोहीम यशस्वी पार पडल्या आहेत. या तीन मोहीम  मधे मुख्य प्रवेशद्वार च काम  30% पूर्ण झालं असून उर्वरित काम नियोजित मोहीम मधे करण्यात येईल .          उर्वरित मोहीम च्या तारखा खालील प्रमाणे......चौथी मोहीम - 23 फेब्रुवारी , पाचवी मोहीम - 09 मार्च,सहावी मोहीम - 23 मार्च ,सातवी मोहीम - 06 एप्रिल, आठवी मोहीम -20 एप्रिल,नववी मोहीम.  -04 मे ,दहावी मोहीम -18 मे,अकरावी मोहीम -01 जून,बारावी मोहीम -15 जून,तेरावी मोहीम - 29 जून, चौदावी मोहीम -13 जुलै,पंधरावी मोहीम -27 जुलै, सोळावी मोहीम -10 ऑगस्ट , सतरावी मोहीम -23 ऑगस्ट, अठरावी मोहीम - 7 सप्टेंबर,ऐकोनविसवी मोहीम -21 सप्टेंबर,विसवी मोहीम -...

सिंधुदुर्ग today

इमेज
सायबर गुन्ह्या संदर्भात सावधान बाळगा  अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांचे नांदगाव येथे जनतेला आवाहन  नांदगाव येथे सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे ग्राम संवाद अभियान   कणकवली (प्रतिनिधी) सायबर गुन्ह्या संदर्भात सर्व नागरिकांनी आपण काळजी घेणे गरजेचे असून सतर्क राहिले पाहिजे आपल्याला सर्व कॉल्स येत असतात आपण एटीएम ची माहिती द्या अथवा आपले आपला मुलगा आमच्या ताब्यात आहे. असे खोटे कॉल्स येत असतात याला बळी न पडता आपण जागरूक राहिले पाहिजे असल्याचे मग सिंधुदुर्ग जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांनी व्यक्त करत पोलीस हेल्प लाईन नंबर संदर्भात माहिती दिली.          सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे ग्राम संवाद अभियान दौरा प्रत्येक गावात सुरू झाला आहे याचाच भाग म्हणून नांदगाव येथे ही सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे ग्राम संवाद अभियान घेण्यात आले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले ,कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, नागेश मोरये, कॉन्स्टेबल किरण मेथे, हवालदार चंद्रकांत झोरे, स्वप्नील जाधव , नांद...

सिंधुदुर्ग today

इमेज
मित्र शिरगाव रोप्यमहोत्सवी निमित्ताने २५ पासून नाट्योत्सव  कणकवली (ऋषिकेश मोरजकर)    देवगड तालुक्यातील शिरगाव येथे शनिवार दिनांक २५ जानेवारी पासून मित्र शिरगाव संस्थेचा २५ वा रोप्यमहोत्सवी नाट्योत्सव सुरु होत आहे.  कार्यक्रम पुढीलप्रमाणे  दिनांक २५ जानेवारी २०२५ - शनिवार - संध्याकाळी ७ वाजता - थिएटर फ्लेमिंगो गोवा निर्मित - मूक भट संध्याकाळी ८.३० वाजता - थिएटर फ्लेमिंगो गोवा निर्मित - स्टॅन्ड अप विनोद दिनांक २६ जानेवारी २०२५ - रविवार -  संध्याकाळी ७ वाजता - वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली निर्मित - हत्ती घूस रेडा गेंडा (दोन अंकी दीर्घाक ),दिनांक २७ जानेवारी २०२५ - सोमवार - संध्याकाळी ७ वाजता - शिरगाव हायस्कूल व मित्र शिरगाव निर्मित एकांकिका - एक्क्याची गोष्ट, संध्याकाळी ८ वाजता  - वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली निर्मित एकांकिका - शिमगो, संध्याकाळी ९ वाजता - समर्थ कलाविष्कार देवगड निर्मित एकांकिका - मशाल अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.     मायबाप रसिक प्रेक्षक, कलाप्रेमी, नाटकप्रेमी, हौशी कलावंताना विनम...

सिंधुदुर्ग today

इमेज
केंद्रशाळा नांदगाव नं.१ येथे २६ जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व आजी-माजी विद्यार्थी, पालक स्नेह मेळावा.    ग्रामस्थ पालकांसाठी वेशभूषा स्पर्धा. कणकवली (ऋषिकेश मोरजकर)      कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील केंद्र शाळा नांदगाव नंबर १ येथे २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वा. वार्षिक स्नेहसंमेलन व आजी-माजी विद्यार्थी, पालक स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून ग्रामस्थ पालकांसाठी वेशभूषा स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांबरोबर पालकांचे ही सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहे.       सायंकाळी ठिक ५.३० वा. ग्रामस्थ,पालकांसाठी (महिला /पुरुष) वेशभूषा स्पर्धा-प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे रोख बक्षिसे. १०००/-,  ७००/-, ५००/-, उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी रु.३००/-,  सायंकाळी ५.३० ते रात्री ९.३० यावेळेत होणा-या शाळेतील विदयार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात माजी विद्यार्थी (हायस्कूल/college मध्ये सध्या शिकत असलेले)यांना निवडक ५ ते ६ ग्रुप डान्स सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.             वेशभूषा स्पर्धेत भा...