सिंधुदुर्ग today
मित्र शिरगाव रोप्यमहोत्सवी निमित्ताने २५ पासून नाट्योत्सव
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
देवगड तालुक्यातील शिरगाव येथे शनिवार दिनांक २५ जानेवारी पासून मित्र शिरगाव संस्थेचा २५ वा रोप्यमहोत्सवी नाट्योत्सव सुरु होत आहे. कार्यक्रम पुढीलप्रमाणे
दिनांक २५ जानेवारी २०२५ - शनिवार - संध्याकाळी ७ वाजता - थिएटर फ्लेमिंगो गोवा निर्मित - मूक भट संध्याकाळी ८.३० वाजता - थिएटर फ्लेमिंगो गोवा निर्मित - स्टॅन्ड अप विनोद दिनांक २६ जानेवारी २०२५ - रविवार - संध्याकाळी ७ वाजता - वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली निर्मित - हत्ती घूस रेडा गेंडा (दोन अंकी दीर्घाक ),दिनांक २७ जानेवारी २०२५ - सोमवार - संध्याकाळी ७ वाजता - शिरगाव हायस्कूल व मित्र शिरगाव निर्मित एकांकिका - एक्क्याची गोष्ट, संध्याकाळी ८ वाजता - वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली निर्मित एकांकिका - शिमगो, संध्याकाळी ९ वाजता - समर्थ कलाविष्कार देवगड निर्मित एकांकिका - मशाल अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मायबाप रसिक प्रेक्षक, कलाप्रेमी, नाटकप्रेमी, हौशी कलावंताना विनम्र आवाहन की सदर कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवावी. सिंधुदुर्ग मधील कला क्षेत्रातील एक मोठी संस्था "मित्र शिरगाव" च्या ३५ वर्षांच्या चळवलीला आपला पाठिंबा, सहभाग, कौतुक आणि प्रेम लाभावे अशी अपेक्षा आयोजकांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा