सिंधुदुर्ग today
नांदगाव असलदे वाले पिर बाबांचा ३१ रोजी उर्स मुबारक.
कव्वाली चा जंगी सामना
कवाल तौसिफ कादरी बेंगलोर विरुद्ध कवालन आफरीन बानू हुबळी कर्नाटक यांच्यात रंगणार
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव असलदे वाले पिर बाबांचा दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी देवगड निपाणी महामार्गा लगत असलेल्या असलदे येथील दर्गा ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
दुपारी २ नंतर नांदगाव तिठा येथील मस्जिद मधून तसेच नांदगाव खालची मुस्लिम वाडी मस्जिद मधून वाजत गाजत संदल एकत्र येऊन नांदगांव तिठा येते २ ते ५ रातीप खेळ खेळला जातो व ५ वाजता संदल घेऊन दरग्या कडे जाण्यास निघतात व असलदे येथील दर्गा पर्यंत सायंकाळी ७ पर्यंत पोहचतात . सिंधुदुर्ग जिल्हा कानाकोपऱ्यातून व जिल्हा बाहेरून ही भाविक येतात.
या उर्स मुबारक निमित्ताने ३१ जानेवारी रोजी ७.३० ते १० पर्यंत नियाज वाटप होते तर रात्री १० वा. कव्वाली चा जंगी सामना कवाल तौसिफ कादरी बेंगलोर आणि कवालन आफरीन बानू, हुबळी कर्नाटक यांच्यात रंगणार आहे.
तरी सर्व भाविकांनी या उर्स मुबारक ला उपस्थित रहावे असे आवाहन उर्स कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा