सिंधुदुर्ग today



केंद्रशाळा नांदगाव नं.१ येथे २६ जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व आजी-माजी विद्यार्थी, पालक स्नेह मेळावा.  
ग्रामस्थ पालकांसाठी वेशभूषा स्पर्धा.

कणकवली (ऋषिकेश मोरजकर) 

    कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील केंद्र शाळा नांदगाव नंबर १ येथे २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वा. वार्षिक स्नेहसंमेलन व आजी-माजी विद्यार्थी, पालक स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून ग्रामस्थ पालकांसाठी वेशभूषा स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांबरोबर पालकांचे ही सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहे.
      सायंकाळी ठिक ५.३० वा. ग्रामस्थ,पालकांसाठी (महिला /पुरुष) वेशभूषा स्पर्धा-प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे रोख बक्षिसे. १०००/-,  ७००/-, ५००/-, उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी रु.३००/-,  सायंकाळी ५.३० ते रात्री ९.३० यावेळेत होणा-या शाळेतील विदयार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात माजी विद्यार्थी (हायस्कूल/college मध्ये सध्या शिकत असलेले)यांना निवडक ५ ते ६ ग्रुप डान्स सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.   
         वेशभूषा स्पर्धेत भाग घेणारे पालक व  ग्रुप डान्स सादर करणारे माजी विद्यार्थी यांनी २४ जानेवारी पर्यंत केंद्रशाळा नांदगाव नं.१ येथे आपली नावनोंदणी करणे आवश्यक आहे. तरी सर्व कार्यक्रमांचा रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापक सुहास सावंत यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today