सिंधुदुर्ग today



सायबर गुन्ह्या संदर्भात सावधान बाळगा 

अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांचे नांदगाव येथे जनतेला आवाहन 

नांदगाव येथे सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे ग्राम संवाद अभियान 

कणकवली (प्रतिनिधी)

सायबर गुन्ह्या संदर्भात सर्व नागरिकांनी आपण काळजी घेणे गरजेचे असून सतर्क राहिले पाहिजे आपल्याला सर्व कॉल्स येत असतात आपण एटीएम ची माहिती द्या अथवा आपले आपला मुलगा आमच्या ताब्यात आहे. असे खोटे कॉल्स येत असतात याला बळी न पडता आपण जागरूक राहिले पाहिजे असल्याचे मग सिंधुदुर्ग जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांनी व्यक्त करत पोलीस हेल्प लाईन नंबर संदर्भात माहिती दिली.

         सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे ग्राम संवाद अभियान दौरा प्रत्येक गावात सुरू झाला आहे याचाच भाग म्हणून नांदगाव येथे ही सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे ग्राम संवाद अभियान घेण्यात आले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले ,कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, नागेश मोरये, कॉन्स्टेबल किरण मेथे, हवालदार चंद्रकांत झोरे, स्वप्नील जाधव , नांदगाव पोलीस पाटील सौ. वृषाली मोरजकर, माजी सरपंच आफ्रोजा नावलेकर, हर्षदा वाळके, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजा नावलेकर ,माजी सैनिक, नांदगाव आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ देसाई, महिला तक्रार निवारण केंद्राचे आदी बहुसंख्येने ग्रामस्थ महिला वर्ग उपस्थित होते.

     कार्यक्रम सुत्रसंचालन व प्रास्ताविक ऋषिकेश मोरजकर यांनी केले तर आभार सरपंच भाई मोरजकर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today