पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांची घेतली शाळा ; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश. रस्ते, शिवसृष्टी आणि देवगड नळपाणी योजनांचा पालकमंत्र्यांकडून  सखोल आढावा. सिंधुदुर्गच्या विकासकामांवर पालकमंत्री नितेश राणेंची बारकाईने नजर. पालकमंत्री नितेश राणे यांचा विविध विकासकामांचा सखोल आढावा. सिंधुदुर्गनगरी: (ऋषिकेश मोरजकर) जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती देत नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आलेली विविध कामे, राजकोट शिवसृष्टी प्रकल्प आणि देवगड नळपाणी योजनेचा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी स्वतंत्र बैठका घेऊन सविस्तर आढावा घेतला.  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करणे, खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देणे, शिवसृष्टी प्रकल्पाला गती देणे आणि देवगड नळपाणी योजना सुरळीत व दीर्घकालीन स्वरूपात कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात आयो...

सिंधुदुर्ग today

इमेज
आगाऊ धान्य वितरणाच्या निर्णयाचा पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला सखोल आढावा. पुरवठा विभागाला वरिष्ठ स्तरावर पाठपुराव्याच्या सूचना; ई-पॉस तांत्रिक अडचणी सोडविण्यावर भर. सिंधुदुर्गनगरी, दि. १ (ऋषिकेश मोरजकर) : कोकणातील दुर्गम व डोंगराळ भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांचे धान्य एकत्रितपणे वितरित करण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या अडचणींचा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज सविस्तर आढावा घेतला. लाभार्थी व रेशनिंग दुकानदारांची गैरसोय टाळण्यासाठी पुरवठा विभागाने शासन स्तरावर तातडीने पाठपुरावा करून योग्य तो मार्ग काढावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रेशनिंग धान्य दुकानदार व रॉकेलधारक संघटनेच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात आयोजित बैठकीत पालकमंत्री राणे बोलत होते. तीन महिन्यांच्या धान्याची एकत्रित उचल व वितरण करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन...

सिंधुदुर्ग today

इमेज
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक. भगवान लोके ; सावडाव धबधबा परिसरात कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने वृक्ष लागवड. कणकवली : कणकवली तालुका पत्रकार संघ सातत्याने सामाजिक बांधिलकीचे उपक्रम घेवून काम करत आहेत. गेल्यावर्षी सावडाव धबधबा परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावर्षी पत्रकार संघाच्यावतीने सावडाव धबधबा परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम राबवला आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक असल्याचे मत अध्यक्ष भगवान लोके यांनी व्यक्त केले.  सावडाव धबधबा परिसरात कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभ सावडाव सरपंच आर्या वारंग यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुका संघाचे अध्यक्ष भगवान लोके , जिल्हा उपाध्यक्ष संतोष राऊळ, उपसरपंच दत्ता काटे, सचिव संजय सावंत , खजिनदार रोशन तांबे ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे , माजी अध्यक्ष रमेश जोगळे , अजित सावंत, चंद्रशेखर देसाई , महेश सरनाईक, सुधीर राणे , उमेश बुचडे , दर्शन सावंत, नितीन कदम, विशाल रेवडेकर, तुषार हजारे , तुषार सावंत, उत्तम सावंत, ...

सिंधुदुर्ग today

इमेज
स्कॉलरशिप परीक्षेत पाचवीतील मीरा सामंत जिल्ह्यात प्रथम;  आम. निलेश राणेंच्या हस्ते झाला सन्मान.  कुडाळ पंचायत समितीच्या वतीने केले होते आयोजन.  सिंधुदुर्ग /प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष 2025/2026 स्कॉलरशिप परीक्षेत पाचवीत इयत्ते मधून कुडाळची मीरा महादेव सामंत ही विद्यार्थिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्यानंतर आज आमदार निलेश राणे यांच्या हस्ते या विद्यार्थांचा कुडाळ पंचायत समिती च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.      तीच्या या यशाबद्दल कुडाळ येथील सामंत परिवार तसेच नांदगाव येथील मोरये परिवार यांनी अभिनंदन केले आहे...

सिंधुदुर्ग today

इमेज
प्रशासनाने अधिक गतीने काम करत शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात पालकमंत्री नितेश राणे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाद्वारे शासनाच्या विविध सेवांचा लाभ. जिल्ह्यातील दुर्गम, डोंगराळ भागांत शासकीय सेवा ऑफलाइन देण्यासाठी प्रयत्न करणार. कणकवली, दि. ३१ (ऋषिकेश मोरजकर) :  सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सेवा जलद, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.  'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' ही संकल्पना त्याच उद्देशाने राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून अधिक गतीने काम करून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना व सेवा पोहोचवून छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य साकार करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून कणकवली येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान'चा शुभारंभ ...

सिंधुदुर्ग today

इमेज
अल्पवयीन बहिणीवर अत्याचार प्रकरणी सख्खा भावाची सशर्त जामिनावर मुक्तता. ॲड. प्राजक्ता शिंदे-सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली/ प्रतिनिधी    अल्पवयीन सख्ख्या बहिणीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीची विशेष सत्र न्यायाधीश ओरोस यांनी 50 हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली.आरोपीतर्फे ॲड. प्राजक्ता म. शिंदे-सावंत यांनी यशस्वी युक्तिवाद केला.       कुमार नारायण राठोड, (वय 23 वर्षे, रा. मखनापूर, ता. उत्तर विजापूर, जि. विजापूर, राज्य कर्नाटक ) हा या प्रकरणी संशयित आरोपी असून त्याच्यावर मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणातील अल्पवयीन पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ओरोस येथील घरी कोणी नसताना तिचा सख्खा भाऊ कुमार राठोड याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे ती गर्भवती राहिली. तो सख्खा भाऊ असल्याने घरात वाद होतील या भीतीने तिने सुरुवातीला कोणालाही याबाबत सांगितले नाही. तसेच पोलीस भावाला अटक करतील या भीतीने सुरुवातीला सिंधुदुर्गनगरी पोली...

सिंधुदुर्ग today

इमेज
एआय माहिती देईल पण जगण्याला दिशा देऊ शकत नाही - अजय कांडर. आचरा ज्युनिअर कॉलेज पारितोषिक सोहळा आणि ग्रंथालय उद्घघाटन समारंभ. आचरा/ प्रतिनिधी       "संवाद हरवल्यास भाषा संपते, भाषा संपल्यास शिक्षण संपते, शिक्षण संपल्यास संस्कृती संपते आणि संस्कृती संपल्यास देश संपतो. त्यामुळे बोलीभाषेतून सुसंवाद साधत संवादाची परंपरा जपणे ही काळाची गरज आहे. शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांतील ज्ञान नव्हे, तर मुलांमधील सुप्त कला, सर्जनशीलता आणि संस्कारांचा सर्वांगीण विकास होय," आजच्या एआयच्या जमान्यात संवादाला फार महत्त्व असून एआय माहिती देईल जगण्याची दिशा देऊ शकत नाही असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर यांनी केले.        धी आचरा पीपल्स असोसिएशन, मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथे आयोजित आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी सत्कार समारंभ, आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण सोहळा आणि ग्रंथालय उदघाटन प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. मुंबई कमिटीचे अध्यक्ष प्रदीप मिराशी यांच्या अध्यक्षतेख...

सिंधुदुर्ग today

इमेज
खोल समुद्रातील मासेमारीला १ ऑगस्ट  पासून परवानगी; किनारी जलक्षेत्रात १५ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम. किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत मासेमारिस १५ ऑगस्टपर्यंत बंदी कायम. नियमांचे पालन करण्याचे मत्स्य विभागाचे आवाहन.  मुंबई, दि. २९ : राज्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ ऑगस्ट २०२६ पासून खोल समुद्रातील विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) म्हणजेच किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंतच्या महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवरील बंदी कायम राहणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे.  पावसाळा हा बहुतांश सागरी माशांच्या प्रजननाचा काळ असल्यामुळे दरवर्षी या काळात मासेमारीवर बंदी घातली जाते. यामुळे माशांची संख्या वाढण्यास मदत होते आणि भविष्यात मत्स्यसंपत्ती टिकून राहते. यंदा राज्य शासनाने यांत्रिक आणि यंत्रचालित मासेमारी नौकांसाठी १ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत बंदी लागू केली आहे. तर केंद्र शासनाने खोल समुद्रातील विशेष आर्थिक क्षेत्रात ३१ जुलैपर्यंत बंदी ल...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव सर्व्हिस रोड लगत ट्रक विद्युत पोल ला धडकून अपघात.  अपघातामुळे दिवसभर सर्व्हिस रोड वरील वाहतूक बंद. अपघाताने पडलेला भला मोठा चर बुजवण्याची मागणी. कणकवली प्रतिनिधी  मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव ओटव फाटा ब्रिज सर्व्हिस रोड लगत आज पहाटे ४ च्या सुमारास विद्युत पोल ला धडकून ट्रकचा अपघात झाला. या अपघातामुळे आज दिवसभर सर्व्हिस रोड वरील वाहतूक बंद पडली होती.          सदर अपघातामुळे रस्ता खचला असून विद्युत पोल मोडले आहेत. सुदैवाने कोणीही यात जखमी झाले नाही. सदर अपघात ग्रस्त ट्रक  आज सायंकाळी काढण्यात आला. मात्र त्या ठिकाणी भला मोठा चर पडल्यामुळे व याच ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने दुसरा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी संबंधित विभागाने त्या ठिकाणी संरक्षण कठडा बांधून रस्त्यावर अपघातामुळे पडलेला चर बुजविण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
मावळे आम्ही स्वराज्याचे यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना. कणकवली /प्रतिनिधी  कणकवली विभागामार्फत गुरुपौर्णिमेनिमित्त कणकवली तालुक्यातील पाच शिवस्मारकांचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचे तसेच अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आणि गुरू आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मावळे आम्ही स्वराज्याचे या संघटनेतर्फे शिवस्मारक पूजन मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडली. यावेळी मावळे आम्ही स्वराज्याचे सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष अनिकेत अनंत तर्फे, कणकवली तालुका प्रमुख प्रतीक भाट, माहिती अधिकारी नील आचरेकर तसेच इतर मावळे व रणरागिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे गुरु पौर्णिमेनिमित्त सभापती सौ हर्षदा वाळके यांनी वयोवृद्ध कलाकार यांचा केला सत्कार. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे वतीने आज गुरु पौर्णिमेनिमित्त सभापती सौ हर्षदा वाळके यांनी नांदगाव वाघाची वाडी येथील वयोवृद्ध कलाकार पेंटर बाबूराव मेस्त्री यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांचा शाल,श्रीफळ, पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.       यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, ग्रामपंचायत सदस्या सौ पुजा सावंत, बुथ अध्यक्ष कमलाकर पाटील तसेच मेस्त्री कुटुंबीय उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
दोन वेळा शेतकरी कर्जमुक्ती देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव मुख्यमंत्री;मंत्री नितेश राणे. कर्जमाफी, वीज माफी मुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा.  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ३८ हजार कोटी ची कर्जमुक्ती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ३६ हजार ५८५ कोटीची लाभ देणारी कर्जमुक्ती. ४८ हजार कोटी ची शेतकऱ्यांची विज बिल थकबाकी  केली माफ. शेतकरी हितासाठी महायुती सरकारने मोठे निर्णय घेतले;आणखी निर्णयांची घोषणाही लवकर. पालकमंत्री नितेश राणे यांचा पत्रकार परिषदेत विश्वास. कणकवली : (ऋषिकेश मोरजकर)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यात प्रथमच दोन वेळा शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती जाहीर केली असून, महाराष्ट्राच्या इतिहासात दोन वेळा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री असल्याचे  मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केला. ४८ हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांची असलेली विज बिल थकबाकी माफ करणारे महायुती सरकार हे सुद्धा एकमेव अ...

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणे शनिवार २५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर. ओम गणेश निवासस्थानी घेणार जनतेच्या गाठीभेटी. कणकवली प्रतिनिधी  राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते सकाळच्या सत्रात कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी जनतेच्या गाठीभेटी घेणार आहेत. तसेच नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

सिंधुदुर्ग today

इमेज
मनाई आदेशभंग प्रकरणी नाम.नितेश राणे, आम.प्रमोद जठार यांच्यासह सर्व १६ जणांची निर्दोष मुक्तता पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे  केले होते दहन. वकील राजेश परुळेकर व वकील ओंकार परुळेकर  यांनी न्यायालयात पाहिले काम. कणकवली, (ऋषिकेश मोरजकर) :  डिसेंबर २०२२ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ कणकवली येथे झालेल्या आंदोलनप्रकरणी दाखल गुन्ह्यात महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे,  आमदार प्रमोद जठार यांच्यासह सर्व १६ आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. १७ डिसेंबर २०२२ रोजी जिल्ह्यात मनाई आदेश लागू असताना कणकवली एसटी स्थानकासमोरील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने करत पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. याप्र...

सिंधुदुर्ग today

इमेज
वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर. कणकवली /प्रतिनिधी  ग्रामिण रुग्णालय वैभववाडी येथे दाखल करण्यात आलेल्या नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे घोषित केल्याच्या रागातून वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव मोरे यांना मारहाण व शिवीगाळ केली. तसेच ग्रामिण रुग्णालयाच्या काचा फोडून शासकीय कर्तव्यात अडथळा आणत नुकसान केल्याप्रकरणी संदीप गणपत तानावडे व वडिल गणपत भाऊ तानावडे यांना अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. टी. त्रिपाठी यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्थ अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. आरोपींच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. २६ एप्रिल २०२६ रोजी सायं. ६.३० वा.च्या सुमारास नऊ वर्षीय मुलगा शिवांश संदीप तानावडे याला ग्रामिण रुग्णालयात आणले. डॉ. वैभव मोरे यांनी तपासल्यानंतर त्याच्यावर यापुर्वीपासून श्वास घेण्याच्या त्रासावर उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या सल्ल्याविरूद्ध रुग्णाला घरी आणले होते. डॉक्टरांनी तपासताच तो कोणताही प्रतिसाद देत नव्हता, हृदयाचे ठोके ऐकू येत नव्हते, श्वसनक्रिया बंद पडली होती. त्यामुळे डॉक्टरांनी मयत घोषीत केले. वार्डबाहेर येऊन डॉ. मोरे व डॉ. समीर...

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवलीत पत्रकारांना वृत्तांकन करताना मज्जाव, विरोध करत पत्रकारांनी दाखवली एकजुट. रिक्षाचालक बाळा वराडकर, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांनी मागितली माफी ; यापुढे पत्रकारांना वृत्तांकन करताना अटकाव होणार नाही... सिंधुदुर्ग : प्रतिनिधी  कणकवलीत महामार्ग उड्डाणपुलाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यानंतर नगरपंचायतच्यावतीने मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास पेट्रोलपंपासमोरील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी फळ व भाजी विक्रेत्यांसाठी तात्पुरती बसण्याची व्यवस्था करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी विक्रेत्यांसाठी जागेची मार्कीग करत असताना कणकवली येथील पत्रकार व्हिडीओ चित्रीकरण व फोटो काढत असताना ऑटो रिक्षाचालक मालक संघटना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळा वराडकर व माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांनी अटकाव केला. यावेळी श्री. वराडकर यांनी आक्षेपार्ह बोलत मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने तातडीची बैठक घेत पत्रकारांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या त्या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच संबंधितांना बोलावुन झालेल्या घटनेबाबत विचारणा केल्यानंतर रिक्षाचा...

सिंधुदुर्ग today

इमेज
गैरकायदा जमा करून मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी वैभव नाईक, संदेश पारकर यांच्यासहित १८ जण निर्दोष. कणकवली / प्रतिनिधी तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान गैरकायदा जमाव करत घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासहित 18 जणांची येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. जी. लतुरिया यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने एड.उमेश सावंत व एड. विरेश नाईक यांनी काम पाहिले.  27 ऑगस्ट 2021 रोजी तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भारतीय जनता पक्षाच्यावतीने जन आशीर्वाद यात्रा आयोजित केली होती. या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कणकवली पोलिसांकडून भाजप व शिवसेना पक्ष यांचे पदाधिकारी यांना सीआरपीसी कलम 149 नुसार नोटीस देण्यात आली होती. तसेच जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेशही लागू केले होते. असे असताना शिवसेना कार्यालय येथे बेकायदा एकत्र येत घोषणाबाजी करण्यात आली होती. याप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांच्यासहित सतीश सावंत, संजय आग्रे, भूषण परुळेकर, रिम...

सिंधुदुर्ग today

इमेज
भुईबावडा कॉपी प्रकरणी मुख्याध्यापक संजय राठोड याला जामीन मंजूर. अँड उमेश सावंत यांनी पाहीले काम.  कणकवली / प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय उंबर्डेचे मुख्याध्यापक संजय कनिराम राठोड यांनी मुलग्याला शालांत परीक्षेत गुण वाढण्यासाठी भुईबावडा केंद्र येथे कॉपी पुरवली होती. याप्रकरणी शालांत परीक्षा मंडळाच्या चौकशीअंती गुन्हा दाखल होऊन अटक झालेल्या संजय राठोड याला येथील प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी एस. जी. लटुरिया यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला आहे. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. मार्च २०२६ मध्ये झालेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षत आपला मुलगा अधिक गुणाने उत्तीर्ण व्हावा, यासाठी काही शिक्षकांना हाताशी धरून बाहेरून लिहून आणलेल्या उत्तपत्रिकांच्या पुरवण्या आरोपी संजय राठोड यांनी उत्तरपत्रीकेसोबत जोडल्या होत्या. याबाबत आदर्श विद्यामंदिर भुईबावडा या केंद्रातील उत्तरपत्रीकांबाबत संशय निर्माण झाल्याने निकाल राखून ठेवला होता. तसेच शालांत परीक्षा मंडळाने चौकशी समिती नेमून चौकशी केली होती. चौकशीअंती आरोपी व अन्य शिक्षक दोषी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्...

सिंधुदुर्ग today

इमेज
सावडाव धबधब्याच्या निसर्गरम्य वातावरणात पत्रकार कुटुंबियांचा आनंद द्विगुणीत. सावडाव धबधब्यावर कौटुंबिक स्नेहमेळावा व पर्यटन सफर उत्साहात ;  कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे सर्वांनी केले कौतुक. कणकवली : प्रतिनिधी  सावडाब  धबधबा येथील निसर्गरम्य वातावरण, धबधब्याचा मनमोहक नजारा आणि कुटुंबीयांचा उत्स्फूर्त सहभाग अशा आनंददायी वातावरणात कौटुंबिक स्नेहमेळावा व पर्यटन सफर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पत्रकार व पत्रकारांचे कुटुंबिय विविध वयोगटातील सदस्यांनी या कार्यक्रमात सहभागी होत आनंददायी क्षण अनुभवले. सावडाव धबधब्याचा आनंद लुटत मौजमजा,  मस्ती केल्याने पत्रकार कुटुंबियांचा आनंद द्विगुणीत झाला होता. शेवटी डिजेच्या तालावर झिंगझिंग झिंगाट यासह विविध गाण्यावर ठेका धरत या कौटुंबिक स्नेह मेळाव्याची  सांगता झाली.  कणकवली तालुका पत्रकार संघ आयोजित सावडाव धबधबा येथे कौटुंबिक स्नेहमेळावा व पर्यटन सफर कौटुंबिक स्नेहमेळावा व पर्यटन सफर कार्यक्रमाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पत्रकार संघाचे अध्य...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव चोरी प्रकरणी ठसे तज्ञ व शॉन पथक यांनी केली तपासणी  कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी दिली भेट. कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा सर्व्हिस रोड लगत असलेला बंगला काल दुपारी ३ ते ५ या वेळेत   भर दिवसा फोडला होता. तसेच या नंतर काही अंतराने नांदगाव मधली वाडी येथे राहते घर फोडल्याचा प्रकार घडला होता. या पाश्र्वभूमीवर आज ठसे तज्ञ व शॉन पथक यांनी नांदगाव येथे घटनास्थळी येऊन तपासणी केली आहे. दरम्यान कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.          याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव ओटव फाटा सर्व्हिस रोड लगत दिनेश शशिकांत कोरगावकर यांचा बंगला आहे कोरगावकर हे काही दिवसापूर्वीच मुंबईवरून गावी आले होते सध्या पावसाळा असल्याने ते सर्व सावडाव या धबधब्या ठिकाणी काल दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास नांदगाव येथून  धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते.  याच दरम्यान दिवसा चोरीचा प्रकार घडला होता. या चोरी मध्ये त्यांचे दोन महागडे मोबाईल चोरीला गेले तसेच स्मार्ट वॉच व काही रोख रक्कम चोरीला ग...