सिंधुदुर्ग today
कोळोशी वरची वाडी येथील १०६ वर्षांचे पर्शुराम खरात यांचे निधन नांदगाव/ वार्ताहर कोळोशी वरची वाडी येथील पर्शुराम खरात (१०६) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. आजूबाजूच्या कमीत कमी १० ते १५ गावातील जंगलातील वाटा त्यांच्या पाया खालच्या होत्या.मात्र एवढी वर्षे जंगलात शेळ्या चरायला नेऊन सुद्धा कधी पायात चप्पल या व्यक्तिने वापरले नाही.तर येता जाताना ते पुढे लागले की शेळ्या एका ओळीत त्यांच्या मागून चालायच्या हि खासियत होती.त्यांना दोन मुलगे,पाच मुली, सुना,जावई, नातवंडे पंतवंडे असा परिवार आहे.