पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
माईण येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत राहते घर भस्मसात   कणकवली (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील माईण येथील अनिल दिनकर सुखटणकर यांचे मोठे असलेले सागवानी लाकडी घर शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत संपूर्ण भस्मसात झाले आहे. सदर घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास माइण येथे घडली.        दरम्यान घटनास्थळी गावातील सर्व नागरिकांनी धाव घेतली तसेच कणकवली पोलीस व अग्निशमन बंब ही दाखला झाला होता मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.       दोन सिलेंडर एक सिलिंडर चा झाला स्फोट दरम्यान त्या जळत असलेल्या घरात दोन सिलेंडर होते. एक सिलेंडर बाहेर काढण्यात यश आले तर दुसऱ्या सिलेंडर चा मोठा स्फोट झाला सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. मात्र लाखोंचे नुकसान घराचे झाले आहे.       गेल्यावर्षी सागवानी असलेल्या घराला लाखोंचा खर्च केला होता. सदर जळीत ग्रस्त घराचा आज पंचनामा करण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव सरस्वती हाय.ची कु.गायत्री वरक जिल्हा गुणवत्ता यादीत  कणकवली|ऋषिकेश मोरजकर  कणकवली तालुक्यातील सरस्वती हायस्कूल नांदगाव मधील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी गायत्री वरक ही एन. एम. एम.एस.शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत आली आहे. वार्षिक रु.१२,००० हजार प्रमाणे चार वर्षांसाठी  शिष्यवृत्तीसाठी पात्र. झालेली आहे.            या यशाबद्दल नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्था नांदगावचे अध्यक्ष नागेश मोरये आणि अन्य संस्था पदाधिकारी यांनी कु. गायत्री हिचे आणि तिला मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक श्री सुधीर तांबे आणि इतर मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.

सिंधुदुर्ग today

इमेज
माझ्या शाळेची नाविन्यपूर्ण परस बाग...हा अभिनय उपक्रम राबविणारी उपक्रमशील शाळा... बावशी. न.१         कणकवली (ऋषिकेश मोरजकर) -----------------------------------------------   सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या बावशी गावाला पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावशी न.१ ...या शाळेने माझी परस बाग हा नाविन्य पूर्ण उपक्रम राबविला आहे..सदरची परस बाग ही संपुर्ण पणे सेंद्रिय बाग आहे..या बागेसाठी लागणारे गांडुळ खत शाळेमध्येचं मोठ्या प्रमाणात बनवले जाते...सदरच्या परस बागेत अनेक प्रकारच्या फळ भाज्या, पाले भाज्या, कंद भाज्या यांचे पीक घेण्यात आले आहे...या मध्ये आले,कोथिंबीर, बीट, गाजर,मिरची, कोबी, फ्लॉवर,लाल मुळा,लाल माठ,मेथी, पालक,मेक्सिकन कोथिंबीर,वांगी, बटाटे, टोमॅटो...इत्यादी अनेक प्रकारच्या नवनवीन भाज्यांचा समावेश केलेला आहे.          माझी परस बाग हा उपक्रम राबवत असतानाच शाळेने गेल्या कित्येक वर्षात अनेक उपक्रम राबविले..ही सर्व उपक्रम राबवत असताना शाळेचे मुख्याध्यापक श्री विनोद ठाकूर गुरुजी  व त्यांच्या सहकारी शिक्षिका सौ. अलका क...

सिंधुदुर्ग today

इमेज
कवी सफरअली इसफ आणि मधुकर मातोंडकर यांना मास्तरांची सावली पुरस्कार प्रदान मुंबई रवींद्र नाट्यमंदिरात ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते सफरअली आणि मातोंडकर यांचा गौरव कणकवली/प्रतिनिधी       मुंबई पु. ल.देशपांडे अकादमी रवींद्र नाट्य मंदिर येथे  स्वामीराज प्रकाशन मुंबई आणि प्रभा प्रकाशन कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सुर्वे मास्तरांच्या साहित्य संमेलनात सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कवी सफरअली इसफ यांना त्यांच्या अल्लाह ईश्वर काव्यसंग्रहासाठी आणि सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांना त्यांच्या सांस्कृतिक योगदानासाठी ' मास्तरांची सावली ' काव्य पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घघाटन झालेल्या आणि राज्याचे भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत समारोप झालेल्या सदर संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार सफरअली इसफ आणि मधुकर मातोंडकर यांना प्रदान करण्यात आला.यावेळी संमेलनाचे आयोजक ज्येष्ठ पत्रकार रजनीश राणे, सुप्रसिद्ध कवी तथा स्तंभ लेखक अजय कांडर, मा...

सिंधुदुर्ग today

इमेज
तोंडवली,विद्यानगरी येथे फार्मसी क्षेत्रातील राज्यस्तरीय परिषद व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न. कणकवली प्रतिनिधी  सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित श्री सरस्वती इंस्टीट्युट ऑफ फार्मसी, तोंडवली ता.कणकवली येथे शनिवार दि.२९ मार्च २०२५ रोजी फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधक यांच्या साठी राज्यस्तरीय परिषद व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली. बारामतीचे प्रा.डॉ. अजय शिंदे, टी.सी.एस. पुणेचे धीरज सराटे, औषध कंपनी सिग्मा लॅबोरेटरी गोव्याचे श्री.अभिजित नाईक यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमासाठी विविध फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे, डॉ.युवराज पांढरे, डॉ. राजेश जगताप  यांची अध्यक्ष म्हणून विशेष उपस्थिती लाभली. मोठ्या संख्येने राज्यभरातून  २८ विविध फार्मसी महाविद्यालयातून चारशेहून अधिक  विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते तसेच ७८ हून अधिक स्पर्धकांनी शोध आधारित पोस्टर सादरीकरण केले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्र. सत्यजित विभूते आदर्श कॉलेज विटा , द्वितीय क्र. अंचिता शिंदे  यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेज व उत्तेजनार्थ ...

सिंधुदुर्ग today

इमेज
संजय तांबे गुणी विचारी कार्यकर्ता ! गुणी विचारी लेखक! मधुकर मातोंडकर .....................       फोंडाघाट येथील संजय तांबे म्हणजे गुणी विचारी कार्यकर्ता गुणी विचारी लेखक. अतिशय अभ्यासूपणे, तळमळीने वैचारिक लेखन करणे हा त्यांचा लेखनाचा गुण विशेष कौतुक करावा असाच आहे. त्याचबरोबर समाजाचे प्रबोधन व्हावं आणि समाज समतेने वागावा हा हेतू ठेवून ते सामाजिक कामही करत असतात. साहित्यिक - सांस्कृतिक कार्यकर्ता म्हणूनही अगदी आपलेपणाने,जिव्हाळ्याने ते कार्यरत असतात.समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या चळवळीला जोडला गेलेला हा गुणी कार्यकर्ता 31 मार्च रोजी निवृत्त होत आहे. यानिमित्ताने संजय तांबे यांना त्यांच्या पुढील निवृत्तीच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!       श्री तांबे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध लेखक म्हणून साहित्य चळवळीत ओळखीचे आहेत. विविधा हे ललित लेखनाचे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर 'समाजभान ' हा त्यांचा वैचारिक ग्रंथ गेल्यावर्षी प्रसिद्ध झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहून विद्रोही चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्या लेखकाचा एवढा उत्तम दुसरा ...

सिंधुदुर्ग today

इमेज
जिल्हा परिषदेने दिला ८२१ लाडक्या लेकींना पाच हजारांचा लाभ. मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांची माहिती. सिंधुदुर्ग दि  (ऋषिकेश मोरजकर) जिल्हयातील ८२१ लाडक्या लेकींना लेक लाडकी योजनेअंतर्गंत पहिल्या हप्त्याच्या रुपात प्रत्येकी पाच हजारांचा लाभ या वर्षात देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली.  महाराष्ट्र राज्यात दिनांक १ एप्रिल २०२३ नंतर जन्म झालेल्या मुलींचे सक्षमीकरण करण्यासाठी शासनामार्फत लेक लाडकी योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गंत एकूण १ लाख १ हजार रुपये वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत मुलींच्या खात्यावर जमा केले जातात. जन्मानंतर पहिला हप्ता पाच हजार रुपयांचा दिला जातो. मुलगी पहिली इयत्तेत गेल्यावर ६ हजार रुपये, इयत्ता सहावीमध्ये गेल्यावर ७ हजार रुपये, इयत्ता अकरावीत गेल्यावर ८ हजार रुपये आणि अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर उर्वरित ७५ हजारांचा शेवटचा हप्ता असे एकूण १ लाख १ हजार रुपये जमा केले जातात.  सन 2024-2025 या आर्थिक वर्षात जिल्हयातून एकूण 821 पात्र लाभार्थी मुलींना लेक लाडकी योजनेच्या पहिल्या हप्त्य...