सिंधुदुर्ग today
नांदगाव सरस्वती हाय.ची कु.गायत्री वरक जिल्हा गुणवत्ता यादीत
कणकवली|ऋषिकेश मोरजकर
कणकवली तालुक्यातील सरस्वती हायस्कूल नांदगाव मधील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी गायत्री वरक ही एन. एम. एम.एस.शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत आली आहे. वार्षिक रु.१२,००० हजार प्रमाणे चार वर्षांसाठी शिष्यवृत्तीसाठी पात्र. झालेली आहे.
या यशाबद्दल नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्था नांदगावचे अध्यक्ष नागेश मोरये आणि अन्य संस्था पदाधिकारी यांनी कु. गायत्री हिचे आणि तिला मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक श्री सुधीर तांबे आणि इतर मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा