सिंधुदुर्ग today



माझ्या शाळेची नाविन्यपूर्ण परस बाग...हा अभिनय उपक्रम राबविणारी उपक्रमशील शाळा... बावशी. न.१

       कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

-----------------------------------------------

  सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या बावशी गावाला पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावशी न.१ ...या शाळेने माझी परस बाग हा नाविन्य पूर्ण उपक्रम राबविला आहे..सदरची परस बाग ही संपुर्ण पणे सेंद्रिय बाग आहे..या बागेसाठी लागणारे गांडुळ खत शाळेमध्येचं मोठ्या प्रमाणात बनवले जाते...सदरच्या परस बागेत अनेक प्रकारच्या फळ भाज्या, पाले भाज्या, कंद भाज्या यांचे पीक घेण्यात आले आहे...या मध्ये आले,कोथिंबीर, बीट, गाजर,मिरची, कोबी, फ्लॉवर,लाल मुळा,लाल माठ,मेथी, पालक,मेक्सिकन कोथिंबीर,वांगी, बटाटे, टोमॅटो...इत्यादी अनेक प्रकारच्या नवनवीन भाज्यांचा समावेश केलेला आहे. 

        माझी परस बाग हा उपक्रम राबवत असतानाच शाळेने गेल्या कित्येक वर्षात अनेक उपक्रम राबविले..ही सर्व उपक्रम राबवत असताना शाळेचे मुख्याध्यापक श्री विनोद ठाकूर गुरुजी  व त्यांच्या सहकारी शिक्षिका सौ. अलका कुटके बाई यांचे योगदान महत्वाचे ठरते..ठाकूर गुरुजी   तब्बल १४ वर्षे या शाळेत   कार्यरत आहेत..त्यांची आणि ग्रामस्थांची नाळ खूप छान जोडली गेली आहे...आत्तार्यंतच्या अनेक उपक्रमांपैकी शाळेतील सर्व मुलांना विमान प्रवासाची सहल घडवून आणणारी जिल्हा परिषद ची पहिली शाळा होण्याचा मान शाळेने पटकावला..यासाठी ठाकूर गुरुजींनी स्वतः पुढाकार घेतला आणि ग्रामस्थानी त्यांना मोलाची साथ दिली.....शाळेमध्ये अनेक नवनवीन उपक्रम या काही वर्षात राबविले गेले..या काळात त्यांना साथ लाभली ती नानचे गुरुजी व त्यापूर्वी शेळके बाई यांची...या सर्वांमध्ये शाळेची व्यवस्थापन समिती,पालक व ग्रामस्थांची शाळेला वेळोवेळी साथ लाभली... सन २०२३-२४ मध्ये शाळेत १५ विद्यार्थी आणि एकच शिक्षक अशी स्थिती निर्माण झाली आणि त्याचवेळी शाळेमध्ये दिनेश पाटील गुरुजी हजर झाले.योगायोगाने दोघेही वर्गमित्र आणि दोघांचीही काम करण्याची पद्धत एकच...या दोघांनी मिळून काही गोष्टींचे नियोजन केले आणि त्याचा नमुना लोकांसमोर सादर केला.. बघता बघता शाळेचा चेहरा मोहरच बदलला..शालेय भिंती बोलक्या झाल्या..त्यातच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमामध्ये शाळेने सलग दोन वर्षे केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला..आणि आज शाळा प्रसिद्धीच्या उत्तुंग शिखरावर आहे..या सर्व बाबींमध्ये शाळा या सर्व बाबींमध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री समीर मयेकर व समितीचे सर्व सदस्य यांनी खूप सहकार्य केले..तसेच या सर्व उपक्रमांमध्ये अंगण वाडी सेविका कांडर मॅडम, अंगण वाडी मदतनिस मर्ये मॅडम,पोषण आहार स्वयंपाकी गुरव मॅडम (नानी)यांचेही वेळोवेळी मोलाचे सहकार्य लाभले.ग्रामस्थ व पालकांनी आपल्या इच्छेनुसार शाळेस वास्तुरुपात,श्रमदानातून व आर्थिक स्वरूपात मदत केली..या उपक्रमामध्ये शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा फार मोलाचे सहकार्य केले...तसेच बावशी येथील मुंबई मध्ये कार्यरत असणाऱ्या मंडळानेही शाळेला मदत केली...अशा प्रकारे सर्वांच्या सहकार्यातून सदर शाळा आज प्रगती पथावर आहे..मागील वर्षी पाटील गुरुजी आणि ठाकूर गुरुजी यांनी शालेय अंतरंग आणि बाह्यांग आकर्षक बनवले तसेच सुंदर परसबाग निर्माण केली....त्यानंतर या वर्षीही ठाकूर गुरुजी आणि कुटके बाई यांनी खूप परिश्रम घेत परस बाग उपक्रम खूप चांगल्या प्रकारे राबविला...आणि.शाळा अशी बनविली ..की प्रत्येक जण म्हणू लागला..ही आवडते मज मनापासूनी शाळा...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today